Stree 2 : बॉक्स ऑफिसवर स्त्री २ चा धुमाकूळ! दुसऱ्या दिवशी कमवले तब्बल 'इतक्या' कोटींचे कलेक्शन

मुंबई : श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव (Rajkumar Rav) यांच्या १५ ऑगस्ट रोजी प्रदशित झालेल्या 'स्त्री २' (Stree 2) चित्रपटाने बॉक्स ऑफिस (Box Office Collection) गाजवायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४६ कोटींहून अधिक कमाई करून नवा रेकॉर्ड केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने फास्ट ट्रॅक पकडून अर्धशतक पूर्ण केले आहे. इतकेच नव्हे तर गदर २, टायगर ३ आणि जवान अशा सुपरहिट चित्रपटांनाही श्रद्धा कपूरच्या या सिनेमाने मागे टाकले आहे. तसेच 'स्त्री २' ने हिंदी भाषेत पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सर्वोच्च १० चित्रपटांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, स्री चित्रपटामध्ये राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. 'स्त्री'च्या यशानंतर स्री २ सुद्धा प्रेक्षकांना पाहायला आवडतोय. बॉक्स ऑफिस वर येताच 'स्त्री २ ' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा केली. तर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यावर अगदी २ दिवसात 'स्त्री २' हाफ सेंच्युरी पूर्ण केली आहे. त्यासोबतच बॉलिवूडमध्ये नवा इतिहास देखील रचला आहे.


दरम्यान, स्त्री २ आठवड्याभरात १०० कोटींचा टप्पा पार करु अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल ६० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. चित्रपटाची मुख्य अभिनेत्री श्रद्धा कपूरला शुल्क म्हणून ५ कोटी रुपये आणि राजकुमार रावला ६ कोटी रुपये मानधन मिळाले आहे. हा चित्रपट आणखी किती कमाई करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट