Wednesday, May 14, 2025

देशमनोरंजनब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

National awards 2024 : ७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा! 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

National awards 2024 : ७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा! 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

जाणून घ्या पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी


मुंबई : मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (National awards 2024) घोषणा आज करण्यात आली आहे. दरवर्षी सर्व भाषांमधील सर्वोत्कृष्ट सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येतं. राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातात. यंदा मराठीमध्ये 'वाळवी' (Vaalvi) चित्रपटाने बाजी मारली आहे. 'वाळवी'बरोबरच आणखी दोन मराठी सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 'मर्मर्स ऑफ द जंगल' या मराठी सिनेमाला बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्मचा अवॉर्ड मिळाला आहे. तर, 'वारसा' या माहितीपटालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.


मल्ल्याळी 'आट्टम' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी 'एकदा काय झालं' या मराठी सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार मिळाला होता. यंदा हा पुरस्कार परेश मोकाशी यांचं दिग्दर्शन असलेल्या 'वाळवी'ने पटकावला आहे. 'आणखी एक मोहेनजोदारो' या सिनेमाला बेस्ट बायोग्राफिकल हिस्टोरिकल कम्पायलेशन फिल्म कॅटेगरीत अवॉर्ड मिळाला आहे. त्याशिवाय, सचिन सूर्यवंशी दिग्दर्शित 'वारसा' या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम कला/सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला.


दरम्यान, 'वाळवी' हा सिनेमा १३ जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे, अनिता दाते, सुबोध भावे अशी या सिनेमाची स्टारकास्ट होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती.



जाणून घ्या पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी


- मल्ल्याळी चित्रपट 'आट्टम'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर


- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - गुलमोहर


- सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म - सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - वाळवी


- साहिल वैद्य यांच्या 'मर्मर्स ऑफ द जंगल बेस्ट डॉक्यु्मेंटरी पुरस्कार


- 'मर्मर्स ऑफ द जंगल'ला बेस्ट नॅरेशनचाही पुरस्कार


- सचिन बाळासाहेब सूर्यवंशींच्या 'वारसा'ला राष्ट्रीय पुरस्कार


- वारसा चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार


- गायक अरिजित सिंह याला हिंदी चित्रपट 'ब्रह्मास्त्र' साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार जाहीर


- हिंदी चित्रपट ब्रह्मास्त्रसाठी संगीतकार प्रीतम यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार


- 'कंतारा' चित्रपटासाठी ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार


- अभिनेत्री नित्या मेनन हिला तिरुचित्रम्बलम करिता आणि मानसी पारेख हिला कच्छ एक्स्प्रेससाठी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार


- मल्ल्याळी चित्रपट 'आट्टम'ला सर्वोत्कृष्ट एडिटिंगचा पुरस्कार


- आनंद एकार्शी यांना 'आट्टम' करिता सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार


- फौजा चित्रपटासाठी नौशाद सदर खान यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार


- सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार 'कंतारा' चित्रपटाला जाहीर

Comments
Add Comment