सायबर गुन्ह्यांबाबत नवी मुंबई पोलिसांची व्हॉट्सअ‍ॅप चॅनलद्वारे जनजागृती

राज्यभरात जनजागृतीसाठी अंमलबजावणीवर भर: पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला


नवी मुंबई : ऑनलाईन व्यवहारात किमान ५० टक्के सायबर क्राईम घडत असतात.सायबर क्राईमबाबत जनजागृती करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेले 'व्हॉट्सअ‍ॅप चॅनल' ची अंमलबजावणी संपूर्ण राज्यभर करण्यात येणार असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सांगितले.


नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत घडणाऱ्या विविध सायबर गुन्हे, महिला विशेष गुन्हे, आर्थिक गुन्हे आणि अमली पदार्थ गुन्हे यांना प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती नवी मुंबई पोलिसांच्या वतीने व्हॉट्सअ‍ॅप चॅनल आणि ८८२८११२११२ हेल्पलाईन नंबर सुरुवात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच चर्चा सत्राचे आयोजन वाशी येथील सिडको एक्जीबिशन सभागृहात बुधवारी सकाळी करण्यात आले होते.


यावेळी, उपस्थित नागरिक, तरुणांना ,उद्योजक व ज्येष्ठ नागरिक यांना मार्गदर्शन करताना, आपण ऑनलाईन ऑर्डर करताना ते मिळेल का याचा विचार करायला हवा तसेच दक्षता घेतली पाहिजे. आपलीं ऑनलाईन व्यवहारात फसवणुक झाल्यानंतर तत्काळ त्यांची माहिती आपल्या आई-वडिलांना भावाला व घरातील ज्येष्ठ नागरिकांना दिली पाहिजे. सायबर क्राईम बाबत मोठया प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक आहे. नवी मुंबई पोलिसांनी व्हाट्सअ‍ॅप चॅनल च्या माध्यमातून जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.नागरिकांनी तसेच तरुणांनी सायबर योध्दा म्हणुन काम केले पाहिजे. असे रश्मी शुक्ला यांनी सांगितले.


गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे. प्रत्येक घरात किंवा शेजारी एक व्यक्ती सायबर गुन्ह्यांचे पिढीत आहेत. नार्को गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे. आपण सजग राहिले पाहिजे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत जुन महिन्यापर्यंत दरोडा, घरफोडी, प्रॉपर्टी चे ५३७ गुन्ह्यात एकुण १३ कोटी ६७ लाख चोरी झाल्याची नोंद झाली आहे. सायबर क्राईम चे ३६१ गुन्ह्यांमध्ये १कोटी ६८ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. अवघ्या ७ महिन्यांत प्रॉपर्टीच्या गुन्ह्यांपेक्षा १३ पट सायबर गुन्ह्याचे प्रमाण असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. नवी मुंबई पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनल द्वारे जनजागृतीसाठी नागरिकांचे देखील सहकार्य अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी - तटकरे

मुंबई : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ

तानसा धरणावर १०० मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प; महापालिकेचे वाचणार वर्षाला १६५ कोटी रुपये

मुंबई (खास प्रतिनिधी) : ​मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तानसा धरणावर आता वीज निर्मिती प्रकल्प उभारला

आश्रय योजनेतील पहिल्या ५१२ सदनिकांचे डिसेंबर अखेरपर्यंत सफाई कामगारांना होणार वाटप

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई शहराला स्वच्छ ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महानगरपालिकेच्या सफाई

आज मुंबईत पंतप्रधान मोदींची 'समुद्री व्हिजन' परिषद!

'मॅरिटाइम सीईओ फोरम'ला करणार संबोधित; १० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार होणार मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज

जनगणना २०२७: मुंबईत पूर्व चाचणी चेंबूर एम पश्चिम विभागात

मुंबई (खास प्रतिनिधी) : जनगणना - २०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या

महाराष्ट्रातील ७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले असून, सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)