Jio Freedom offer 2024: जिओच्या स्पेशल ऑफरने उडवली BSNL, Airtel आणि Viची झोप

मुंबई: आज संपूर्ण भारत देश ४८वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या निमित्ताने अनेक टेलिकॉम कंपन्यां अनेक खास ऑफर्स देत आहेत. या निमित्ताने जिओनेही अशीच ऑफर सादर केली आहे. ही ऑफर नक्कीच एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि खासकरून बीएसएनएलला मोठी टक्कर देऊ शकतात.



जिओची शानदार ऑफर


जिओच्या या ऑफरचे नाव फ्रीडम ऑफर आहे. जिओची ही खास ऑफर त्या लोकांसाठी आहे ज्यांना आपल्या घरी वायफाय लावायचे आहे. जर तुम्ही एअरटेल, व्हीआय अथवा बीएसएनएलप्रमाणेच कोणतीही ब्रॉडबँड सर्व्हिस देणारी कंपनी वायफाय सर्व्हिस आपल्या घरी लावत असेल तर त्यासाठी वन टाईम इन्स्टॉलेशन चार्ज द्यावे लागते.


रिलायन्स जिओची वायफाय सर्व्हिस म्हणजेच जिओ एअरफायबरला इन्स्टॉल करण्यासाठी ग्राहकांना वन टाईम इन्स्टॉलेशन चार्ज द्यावे लागतात याची फी १००० रूपये आहे. दरम्यान, जिओने स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने जिओ एअरफायबर आपल्या नव्या ग्राहकांना फ्री इन्स्टॉलेशन सर्व्हिस देण्याची ऑफर आणली आहे.



१००० रूपयांचा होणार फायदा


याचा अर्थ जर तुम्ही जिओ एअरफायबरची नवी सर्व्हिस आपल्या घरी लावत असाल तर तुम्हाला १००० रूपये वन टाईम इन्स्टॉलेशन फी द्यावी लागणार नाही. तुम्ही सरळ १००० रूपयांची बचत करू शकता. दरम्यान, जिओच्या या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागेल.


जिओची ही फ्रीडम ऑफर ३ महिन्याच्या ब्रॉडबँड प्लानसाठी आहे. जिओच्या या प्लानसाठी युजर्सला २१२१ रूपये खर्च करावे लागतील. या एअरफायबर प्लानसोबत युजर्सला ३० एमबीपीएसचा इंटरनेट स्पीड, १००० जीबी डेटा, १४ ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते.

Comments

Arun Mali    August 17, 2024 03:24 PM

जिओच्या नावाने विविध योजनांच्या बातमी लोकांपर्यंत सोशल मीडियावर प्रसारित केल्या जातात, परंतु या बातम्या निरर्थक आणि बिनकामाच्या असतात. वरील बातमी देखील तशीच आहे. सध्या बऱ्याच कंपन्या इंस्टोलेशन चार्जेस घेत नाही. त्यात जियो जर घेत नसेल तर त्यात काहीही आश्चर्य नाही. आपण लोकल केबल नेटवर्क च्या माध्यमातून देखील चांगले प्लॅन स्वीकारू शकता. मी नुकतेच जियो पेक्षा 10 Mbps अधिक स्पीड असलेला प्लॅन लोकल केबल नेटवर्क च्या माध्यमातून 40 mbps चा प्लॅन अवघ्या 3000 मध्ये घेतला असून, त्यांनी माझ्याकडून कोणतेही अधिक शुल्क मोजावे लागले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर कुणीही अशा निरर्थक प्लॅन बद्दल माहिती देऊ नये. लोकांनी यापासून सावध राहिले पाहिजे...

Add Comment

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या