Vinesh Phogat: विनेश फोगाटची याचिका फेटाळली, भारताला रौप्य पदक मिळण्याच्या आशा संपुष्टात

मुंबई: भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटची याचिका CAS ने फेटाळून लावली आहे. याचा अर्थ आता भारताच्या खात्यात रौप्य पदक येणार नाही. विनेश फोगाटचे वजन फायनल सामन्याआधी १०० ग्रॅम अधिक भरले होते. या कारणामुळे तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्या आले होते. यासंदर्भात तिने रौप्य पदक देण्यात यावे अशी याचिका केली होती. याचा निर्णय १६ ऑगस्टला सुनावला जाणार होता मात्र CAS ने त्याआधीच तिची याचिका फेटाळून लावली आहे.


यासंबंधी भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष पीटी उषा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे तसेच या निर्णयाने त्यांनाही धक्का बसला आहे. विनेशने ७ ऑगस्टला रौप्य पदक मिळावे अशी याचिका केली होती. CAS ही मागणी स्वीकारलीही होती. या प्रकरणाची सुनावणी ९ ऑगस्टला झाली. याच विनेशला चार वकिलांनी प्रतिनिधित्व केले आणि सोबतच भारताचे टॉप वकील हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया यांनाही मदतीसाठी पाठवण्यात आले होते.


युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने आधीच स्पष्ट केले होते की ते विनेश फोगाट अथवा इतर कोणत्याही खेळाडूसाठी नियमांत बदल करण्याच्या बाजूने नाही. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनीही यासंबंधी हेच विधान जारी केले होते.



अपात्र ठरवल्यानंतर घेतली निवृत्ती


विनेश फोगाटने फायनल सामन्याआधी अपात्र घोषित झाल्यानंतर ८ ऑगस्टला कुस्तीतून संन्यास घेतल्याची घोषणा केली होती. तिने सोशल मीडियावर ट्वीट करत लिहिले, आई कुस्ती जिंकली, मी हरले. मला माफ करा. तुमचे स्वप्न आणि माझे धैर्य तुटले आहे. माझ्यामध्ये आता अधिक हिंमत नाही. कुस्तीला माझा सलाम. माझे करिअर २००१-२०२४ पर्यंतच होते. दरम्यान, संपूर्ण देशाला आशा लागून होती की विनेशला रौप्य पदक दिले जाईल मात्र याचिका फेटाळल्याने भारतीयांच्या आशांना मोठा झटका बसला आहे.

Comments
Add Comment

भारतीय संघाच्या टी-२० विश्वचषक मोहिमेला सुरुंग

सुंदर दुखापतग्रस्त; आयुष बदोनीला संधी? मुंबई : आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या तोंडावर भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणीत

टी-२० मध्ये शतकांच्या यादीत डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या स्थानावर

विराट कोहलीचा विक्रम मोडला मुंबई : ३९ वर्षीय डेव्हिड वॉर्नरने बिग बॅश लीगमध्ये पुन्हा धावांचा पाऊस पाडला. सिडनी

विराट कोहलीच्या बाबतीत आयसीसीने चूक वेळीच सुधारली

८२५ नव्हे, तर १५४७ दिवस होता अव्वल स्थानी मुंबई : विराट कोहलीने आयसीसी वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत चार

भारत-न्यूझीलंड मालिकेचा निकाल इंदूरच्या ‘होळकर’वर

शुभमन गिलसाठी प्रतिष्ठेची लढाई, विजयाची परंपरा राखण्याचे आव्हान इंदूर : भारतीय क्रिकेट संघासाठी २०२६ वर्षाची

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय