हाजी शेख हत्या प्रकरणात आरोपींची वाढ!

चंद्रपूर : कोळसा तस्करीत डॉन समजल्या जाणाऱ्या कुख्यात हाजी शेख हत्या प्रकरणात काल सकाळी सुरेंद्र यादव या आरोपीला नागपुरातून अटक करण्यात आल्याने प्रकरणातील आरोपींची संख्या सहावर पोहचली आहे. दरम्यान ६ आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. कुख्यात हाजी शेख वर सोमवारी दुपारी शहरातील एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना आरोपींनी गोळ्या झाडल्या. सोबतच चाकूने देखील सपासप वार केले. गंभीर अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी सायंकाळपर्यंत मुख्य आरोपी समीर शेखसह राजेश मुलकलवार, प्रशांत उर्फ पशी मालवीनी, निलेश उर्फ पिंटू ढगे, श्रीकांत कदम या ५ आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आणखी एक आरोपी सुरेंद्र यादव याला काल सकाळी नागपुरातून अटक करण्यात आली. त्यामुळे सध्या यातील आरोपींची संख्या सहा झाली. या सर्व आरोपींना चंद्रपूर प्रथम श्रेणी न्यायालयात पेश केले असता समीर शेखसह सर्वांना १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच यामध्ये आणखी आरोपी असू शकतील अशीही शक्यता वर्तविली जात आहे.

Comments
Add Comment

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या

दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय जनगणना होणार; मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केला संभ्रम दूर

मुंबई: एप्रिलपासून सुरु होत असलेली जनगणना पहिल्या टप्प्यातील असून यामध्ये केवळ घरगणना होत आहे. त्यामुळे

नागपूर नवीन विधानभवनचे काम विहित कालावधीत पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: नागपूर नवीन विधानभवनचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. विधानसभा आणि विधान परिषदेचे सभागृह, मध्यवर्ती

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख