मुंबई: प्रत्येक व्यक्तीला नेहमी सुंदर आणि तरूण दिसायचे असते. मात्र हे शक्य नाही. कारण जसजसे वय वाढत जाते तसतसे चेहऱ्यावर वय दिसू लागते. चेहऱ्यावर सुरकुत्या, फाईन लाईन्स आणि स्किन पातळ होत जाणे हे वय वाढत असल्याचे संकेत आहेत. मात्र तुम्ही तुमच्या डाएटमध्ये काही गोष्टींचा समावेश करून दीर्घकाळ तरूण राहू शकता.
हेल्दी डाएट तुम्हाला दीर्घकाळ तरूण आणि फिट ठेवू शकते. तुमच्या डाएटमध्ये फळे, हिरव्या भाज्या, सुका मेवा, बिया तसेच डेअरी उत्पादनांचा समावेश केला पाहिजे. खासकरून ३० वयानंतर तुम्हाला दररोज पोषणने भरलेल्या आहाराचे सेवन केले पाहिजे. जेव्हा तुम्ही व्हिटामिन, मिनरल आणि फायबरयुक्त गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करता तेव्हा त्वचा आतून निरोगी राहते आणि वय वाढल्याची लक्षणेही दिसत नाहीत.
जर तुम्हाला स्वत:ला फिट ठेवायचे असेल तर दररोज एक्सरसाईज करा. अॅक्टिव्ह लाईफस्टाईलमुळे तुम्ही दीर्घकाळ स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकता. दररोज कमीत कमी ३० मिनिटे व्यायाम गरजेचा आहे. ज्यांच्याकडे जिमला जाण्यासाठी वेळ नाही ते घरातच हलकाफुलका व्यायाम करू शकतात. वॉक, योगा तसेच सायकलिंग करून तुम्ही स्वत:ला फिट ठेवू शकता.
अधिक ताण अथवा चिंता तुम्हाला लवकर म्हातारे बनवू शकते. तणाव हा सायलेंट किलरप्रमाणे असतो जो तुम्हाला आतून पोकळ बनवतो. तुम्हाला दीर्घकाळ तरूण राहायचे असेल तर तणाव घेऊ नये.
हेल्दी शरीर आणि त्वचेसाठी झोप अतिशय गरजेची आहे. जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. चांगली झोप तुमचे वय वाढण्याचा स्पीड कमी करते.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…