मुंबई: पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये भारताला एकमेव रौप्य पदक मिळवून देणाऱ्या स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मात्र तो आता उशिरा घरी परतणार आहे. नीरज चोप्रा पॅरिसवरून सरळ जर्मनीला रवाना झाला आहे. तो मेडिकल अॅडव्हाईससाठी जर्मनीला गेला आहे.
नीरजला हर्नियाचा त्रास आहे. अशातच मेडिकल चेकअपमुळे जर्मनीला जाण्यास सांगितले आहे. जर गरज पडल्यास तेथे त्याच्यावर सर्जरी होऊ शकते. यानंतर नीरज घरी परतणार आहे.
एक महिन्यापर्यंत जर्मनीत राहणार नीरज चोप्रा
पॅरिस ऑलिम्पिक २६ जुलैपासून ते ११ ऑगस्टपर्यंत सुरू होते. क्लोजिंग सेरेमनीनंतर बातमी आली होती की नीरज चोप्रासह सर्व खेळाडू १३ ऑगस्टला भारतात परततील. मात्र त्याआधी मिडिया रिपोर्टनुसार ही माहिती समोर आली आहे की तो भारतात परतत नाही आहे.
नीरज आपल्या उपचारासाठी आणि सर्जरीसाठी पॅरिसवरून सरळ जर्मनीला गेला आहे. गरज पडल्यास सर्जरी करावी लागू शकते. नीरज चोप्रा एक महिन्यापर्यंत जर्मनीमध्ये राहील.