Tuesday, March 18, 2025
Homeक्रीडाक्रिकेट प्रेमींना लागली लॉटरी, केवळ ५० रूपयांत मिळणार तिकीट, लंच आणि चहाची...

क्रिकेट प्रेमींना लागली लॉटरी, केवळ ५० रूपयांत मिळणार तिकीट, लंच आणि चहाची सुविधा उपलब्ध

मुंबई: बांग्लादेश क्रिकेट संघ लवकरच पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. येथे दोन्ही संघादरम्यान २ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका २१ ऑगस्टपासून सुरू होत आहे. पहिला सामना रावळपिंडीमध्ये आणि दुसरा सामना कराचीमध्ये खेळवला जाईल. यातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनोखा निर्णय घेतला आहे कारण तिकीटांचे दर कमी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

खरंतर, पीसीबीने हा निर्णय मैदानामध्ये अधिकाधिक सीट भरण्यासाठी घेतला आहे. सगळ्यात स्वस्त तिकीट दर ५० रूपये आणि हे दर स्टेडियममधील जागांनुसार वाढत जाईल. कराची स्थित नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये ५० रूपयांपासून तिकीट दर आहेत. तर प्रिमियम अनुभव ठेवण्यासाठी लोकांना तिकीट अधिकाधिक किंमत दीड लाख रूपये ठेवण्यात आली आहे.

लंच आणि चहाची सुविधा

दुसरीकडे रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमबद्दल बोलायचे झाल्यास पाकिस्तान-बांग्लादेश पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. येथे तिकीटांची किंमत २०० रूपयांपासून सुरू होत आहे. चाहत्यांसाठी एक गॅलरी पासचीही सुविधा ठेवण्यात आली आहे. गॅलरी पासची किंमत २८०० रूपये ठेवण्यात आली आहे. हे तिकीट खरेदी करणाऱ्या व्यक्तींना लंच आणि चहाची सुविधा दिली जाईल.

वर्ल्डकपनंतर पाकिस्तानचा पहिली मालिका

टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये पाकिस्तानी संघाच्या खराब कामगिरीमुळे सुपर ८ मध्ये पोहोचू शकली नव्हती. त्या आयसीसी स्पर्धेनंतर पाकिस्तान संघ पहिली मोठी मालिका खेळवत आहे. यातच बांग्लादेश संघ आपल्या देशात सुरू असलेल्या विरोध प्रदर्शनामुळे शेड्यूल्डच्या आधीच पाकिस्तानात येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -