मुंबई: बॉलिवूडची चकाचक गर्ल सारा अली खानसाठी आजचा दिवस खास आहे. खरंतर आज १२ ऑगस्टला सारा आपला २९वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने तिचे फिल्मी फ्रेंड आणि हजारो चाहते विश करत आहेत. या स्पेशल डेला सैफ अली खानची दुसरी पत्नी आणि साराची सावत्र आई करीना कपूरनेही खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
करीना कपूर खानने पोस्ट शेअर करत लिहिले, हॅपी बर्थडे डार्लिंग सारा, तुला माझ्याकडून खूप सारे प्रेम आणि सोबतच भोपळ्याची भाजी पाठवत आहे. यासोबतच करीनाने हॉर्ट इमोजीला एक रेनबो इमोजी लावला आहे. करीनाची ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे.
करीना आणि साराच्या नात्याबाबात नेहमीच चर्चा होत असते. सारा अली खानने एका मुलाखतीत म्हटले होते, मी करीनाला आई मानत नाही. माझ्याकडे प्रेमळ आई आहे. केवळच करीनाच नव्हे तर सैफलाही असे वाटत नाही की साराने करीनाा छोटी आई म्हणून हाक मारावी. सारा करीनाला नावानेच बोवलेत अथवा k म्हणून बोलवते.
सारा अली खान आजही बॉलिवूडची स्टार किड मानली जाते. केदारनाथ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यासाठी तिला बेस्ट डेब्यू अवॉर्ड मिळाला होता. अभिनेत्रीच्या अपकमिंग सिनेमाबाबत बोलायचे झाल्यास ती मेट्रो इन दिनोमध्ये दिसणार आहे.
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…
ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…