Shravani Somvar : उद्या दुसरा श्रावणी सोमवार; महादेवाला अर्पण करा 'ही' शिवमूठ!

हिंदू धर्मात श्रावण (Sharavan 2024) महिना हा पवित्र महिना मानला जातो. तसेच श्रावण महिन्यातील सोमवार (Shravani Somvar) हा विशेष मानला जातो. श्रावण महिन्यातील सोमवार हा शुभ दिवस असून भक्ताने या दिवशी मनोभावे महादेवाची पूजा केली तर भगवान शिव त्याच्या मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते. ५ ऑगस्टपासून या श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून उद्या म्हणजेच १२ ऑगस्ट रोजी दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे. या दिवशी शुभ संयोग जुळून आला आहे. जाणून घ्या कोणता आहे शुभसंयोग आणि या दिवशी कोणती शिवमूठ वाहावी याची माहिती.


ज्योतिषशास्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लक्ष्मी नारायण आणि शश राजयोगाचा संयोग जुळून आला आहे. या दिवशी महादेवाची पूजा करुन जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केला जातो. तसेच दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवमूठ म्हणून तीळ वाहण्याची परंपरा असते.



दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवपिंडीचे पूजन कसे करावे?


स्नान करुन स्वच्छ कपडे घालून व्रताचा संकल्प करावा. यानंतर शिवाचे ध्यान करुन 'ॐ नमः शिवायै' या मंत्राचा जप करावा. महादेवाला पांढरा रंग प्रिय असल्यामुळे दुसऱ्या श्रावणी सोमवारी पांढऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात. यामध्ये शिवमूठ म्हणून तीळ वाहिले जाते. तसेच दिवसभर उपवास करावा.

Comments
Add Comment

BSNL युजर्ससाठी खुशखबर; नेटवर्क नसले तरी करता येतील कॉल्स आणि मेसेज

मुंबई : मोबाईल नेटवर्क नसले तरी आता कॉल आणि मेसेज करता येणार आहेत. होय तुम्ही बरोबर वाचताय. नवीन वर्षाच्या

हेमंत ढोमेच्या सिनेमाची धडाकेबाज कमाई ; लवकरच पार करणार १ कोटींचा आकडा

KJVMM Box Office: वर्षाच्या पहिल्याच दिवशी मराठी शाळेतल्या पोरांनी बॉक्स ऑफिस गाजवलं मुंबई: महाराष्ट्रात आज 'मराठी भाषा'

भारतच नव्हे, लंडनच्या ट्रेनमध्येही विकले जातात समोसे..

लंडन : सध्या सोशल मीडियावर अमेरिकेतील ट्रेनमधील एक फोटो व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक भारतीय व्यक्ती

दीपिकाला सोडून आता संदीप रेड्डी वांगांच्या ‘स्पिरिट’मध्ये ‘नॅशनल क्रश’ ची एंट्री

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी ‘स्पिरिट’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

जेवल्यानंतर एक ग्लास ताक पिण्याने आरोग्याला होतात अनेक फायदे

ताक हे आरोग्यासाठी गुणकारी असून पूर्वीपासूनच आहारामध्ये ताकाचा समावेश केला जातो. ताक आणि दही हे दोन्हीही पदार्थ

प्लंबिंगपासून ते दिग्दर्शनापर्यंतचा प्रवास, ‘रुबाब’मधून मराठी सिनेसृष्टीत नव्या दिग्दर्शकाची एन्ट्री

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत नवनव्या विषयांसोबतच स्वतःच्या संघर्षातून घडलेले नवे दिग्दर्शक आपली ओळख निर्माण