माझे सोबती : कविता आणि काव्यकोडी

घरीदारी मला भेटती
नवे जुने माझे सोबती

घरात आई, बाबा, ताई
लाड माझे पुरवीत राही

शेजारीपण किती चांगले
गप्पाटप्पा खेळ रंगले

शाळेत मोठ्ठं मित्रमंडळ
थोडं खट्याळ खूप प्रेमळ

गुरुजी, बाई,
शिपाई काका
प्रेमाने मला
मारतात हाका

अंगणात आहे
फुलांची बाग
वाटेत आहे
झाडांची रांग

पाखरांचा थवा
रोज भेटतो
जीवाभावाचे
हितगुज साधतो

गाय, वासरू,
मांजर, मोती
तेही आहेत
माझे सोबती

साऱ्यांमुळे
आपला परिसर हसे
सुंदर साजिरा
गोजिरा दिसे

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) खेळ खेळता येतो
हिशेब ठेवता येतो
माहितीचा खजिना
उघडून नवा देतो

पदोपदी माणसाच्या
उपयोगी पडतो
कोण हा मित्र
जगाशी जोडतो?

२) पोस्टमनची वाट
पाहायला नको
तिकीट, पाकीट तर
नकोच नको

पाठवल्यावर खात्रीने
भेटतो हा मित्र
नव्या काळातलं
हे कोणतं पत्र?

३) चुन्यासोबत आल्यावर
कुंकू तयार होते
अंगाला चोळल्यास
उजळपणा देते

रोजच्या जेवणात
घरगुती उपचारात
कोणती ही वनस्पती
हमखास वापरतात?

उत्तर -


१) संगणक 
२) ईमेल
३) हळद
Comments
Add Comment

परिश्रमाशिवाय कीर्ती नाही

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मनुष्याला जीवनात यश, मान-सन्मान आणि कीर्ती हवी असते. पण ही कीर्ती केवळ

हवेचे रेणू

कथा : प्रा. देवबा पाटील सीता व नीता ह्या दोन्ही बहिणींना वाचनाची अतिशय आवड होती. त्यांचे आई-बाबा दरमहा

मनाची श्रीमंती!

कथा : रमेश तांबे दिवाळी नुकतीच संपली होती. दिवाळीचे चार-पाच दिवस कसे संपले हे नमिताला कळलेच नव्हते. दिवाळी येणार

पारदर्शक पदार्थ

कथा : प्रा. देवबा पाटील सीता व निता या दोघी बहिणींना जशी अभ्यासाची गोडी होती तशीच वाचनाचीसुद्धा आवड होती. त्या सतत

बदलांचा स्वीकार!

खरे तर बदलांचा स्वीकार करणे याला खूप चांगला इंग्रजी शब्द आहे ऍडॉप्शन! आपण कितीही मनात आणले तरी आपल्याला हवे तसे

कचरा कचराकुंडीतच टाकावा !

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर ‘स्वच्छ मुंबई ,सुंदर मुंबई ‘ असे फलक मुंबईत ठिकठिकाणी आपण पाहतो. अनेक