CM Eknath Shinde : शेवटी 'अ‍ॅक्शनला-रिअ‍ॅक्शन' मिळतेच, पण याचं कुठलंही समर्थन करणार नाही!

  39

ठाकरेंच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकल्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया


ठाणे : ठाण्यात (Thane) गडकरी रंगायतन या सभागृहात शनिवारी सायंकाळी ठाकरे गटाचा (Thackeray Group) मेळावा पार पडला. यावेळी या मेळाव्यासाठी कार्यक्रमस्थळी दाखल झालेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मनसे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील कारवर शेण, नारळ व बांगड्या फेकल्या. त्याचबरोबर त्यांच्या ताफ्यातील कारच्या काचाही फोडल्या. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'अ‍ॅक्शनला-रिअ‍ॅक्शन' मिळते असं म्हणत त्यांनी ठाकरेंना डिवचलं आहे.


एकनाथ शिंदे म्हणाले, "राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यात ठाकरे गटाने याची सुरूवात केली. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा नाही. दगडफेक करणं, सुपाऱ्या टाकणं हे कुणालाही आवडलं नाही. शेवटी 'अ‍ॅक्शनला-रिअ‍ॅक्शन' मिळते. पण, याचं कुठलंही समर्थन करणार नाही", असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.


"आम्ही सत्तेत आल्यापासून हे 'सरकार घटनाबाह्य आहे, एक महिन्यात पडणार' असं बोललं जातं. दोन वर्षे झाली, सरकार अधिकाधिक मजबूत होत गेले. कारण, आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार सोडले नाहीत. त्यामुळे लोक आमच्यासोबत येत आहेत. ज्यांनी विचार सोडले, त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. म्हणून आपले ध्येय, विचार ठरवले पाहिजे. सत्तेसाठी कुठलीही तडतोड आम्ही केली नाही," असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.


"धनुष्यबाण वाचविण्यासाठी आम्ही बंड करण्याचा निर्णय घेतला. आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पक्ष भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. लोकसभेला 'स्ट्राइक रेट' पाहिला, तर लोकांनी पसंती आणि मान्यता कुणाला दिली, हे सांगण्याची आवश्यकता नाही," अशी कोपरखळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाला मारली आहे.

Comments
Add Comment

नागपूर - पुणे वंदे भारत या दिवसापासून धावणार

नागपूर : नागपूर (अजनी) ते पुणे आणि पुणे ते नागपूर (अजनी) अशी वंदे भारत एक्सप्रेस रविवार १० ऑगस्ट २०२५ पासून धावणार

एसटी महामंडळाच्या राखी पौर्णिमेसाठी ४० जादा गाड्या कार्यरत

लाडक्या बहिणींसाठी ८, ९ आणि ११ ऑगस्ट रोजी बसची विशेष सेवा पेण(स्वप्नील पाटील) : आधीच लाडक्या बहिणींना एसटी

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

नियमितपणे आढावा, समन्वय साधणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई : राज्यातील पाच

माधुरी लवकरच कोल्हापूरला परतणार!

कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश; माधुरीला परत पाठवण्याबाबत वनताराकडून आश्वासन कोल्हापूर: कोल्हापूरकरांच्या

उत्तराखंडमधील ढगफुटीत अडकले महाराष्ट्रातील ५१ पर्यटक

सर्व पर्यटक सुखरूप असल्याची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई : उत्तराखंडमधील राज्यातील उत्तरकाशी

Hingoli Train Fire : हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या बोगीला भीषण आग; संपूर्ण बोगी जळून खाक

हिंगोली : हिंगोली शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका जुन्या बोगीला बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८:३०