मुंबई : “जेव्हा बाळासाहेब गेले तेव्हाच शिवसेना संपली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांना शिव्या देण्याच काम करत आहेत.” असा जोरदार प्रहार भाजपा नेते, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
सिंधुदुर्गमधील एका कार्यक्रमात बोलताना नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. राणे पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस बुद्धीमान आहेत. ते सज्जन आहेत त्यामुळे ठाकरेंच्या टीकेला ते उत्तर देत नाहीत.”
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना फुटल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना शिंगावर घेत आहेत. अशात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सोडले नाही. फडणवीस यांनीच त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हायला भाग पाडले. यामुळे जळीस्थळी काष्ठी पाषाणी त्यांना फडणवीस दिसतात. त्यामुळे गेल्या दोन अडीच वर्षात असा एकही कार्यक्रम, सभा नाही जिथे ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली नसेल.
दरम्यान देवेंद्र फडणवीस ठाकरेंना थेट प्रत्युत्तर देत नसले तरी भाजपाचे दुस-या फळीतील नेते मात्र, फडणवीसांच्या टिकेला चोख उत्तर देत ठाकरेंवर हल्लाबोल करत असतात.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…