पॅरिस: पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये भारताला भालाफेक प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. या प्रकारात पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर लांब फेकत सुवर्णपदक पटकावले.
भारताच्या नीरज चोप्राकडून भारताला सुवर्णपदकाच्या आशा होत्या. मात्र त्याने ८९.४५ मीटर थ्रो केला. नीरजचे सहापैकी चार थ्रो फाऊल गेले. शेवटचा थ्रोही नीरजचा चांगला होऊ शकला नाही. त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
दरम्यान, नीरज चोप्राने सलग दुसरे ऑलिम्पिक पदक मिळवले आहे. टोकियो ऑलिम्पिक २०२४मध्ये नीरजने सुवर्णपदक मिळवले होते. या ऑलिम्पिकमध्ये त्याने रौप्यपदक पटकावले आहे.