वजन वाढल्यामुळे भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिला अपात्र ठरवण्यात आले असून हा भारतासाठी सर्वात मोठा धक्का आहे. फोगट हिला अपात्र ठरल्यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करून फोगट हिला सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताचे चौथे पदक निश्चित झाल्याचे वृत्त असतानाच ही वाईट बातमी आली आहे. यामुळे फोगटवर नव्हे तर संपूर्ण भारतावर निराशेचे सावट पसरले आहे. ५० किलो वजनी गटाच्या स्पर्धेअगोदर तिचे वजन वाढले होते आणि एका वृतपत्राने दिलेल्या माहितीनुसार विनेशचे वजन जास्त असल्यानेच तिला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अपात्र ठरवण्यात आले होते. फोगटचे वजन मर्यादेपेक्षा १०० ग्रामने जास्त आहे. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. सर्व संकटांना झुगारून देऊन अंतिम फेरीत पोहोचलेल्या फोगटचे वजन मंगळवारी करण्यात आले तेव्हा ते आवश्यकतेपेक्षा १०० ग्राम जास्त भरले. ती रात्रभर झोपली नाही आणि तिने सायकलिंग आणि जॉगिंगसारखे अनेक कसरतीचे प्रयत्न केले. पण तिचे वजन आटोक्यात आलेच नाही आणि परिणामी ती अपात्र ठरली. विनेश फोगट ही अंतिम फेरीत अपात्र ठरली ही भारतीय पथकासाठी अत्यंत निराशानजनक बाब आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय ऑलिम्पिक पथकाने दिली आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला अनेक प्रकारे धीर दिला आहे. पण आता तिचे नुकसान कधीही भरून न येणारे झाले आहे. आता तर तिची तब्येतही बिघडली आहे, असे सांगण्यात येत आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कालच्या अभूतपूर्व विजयानंतर भारत आज सुवर्णपदकाची वाट पाहत होता. पण आज त्याच्यावर विनेश फोगटला अपात्र ठरवण्याचे संकट येऊन कोसळले, त्यामुळे संपूर्ण भारतात निराशेची लाट पसरली. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत आणि विनेशला त्यातून जोरदार समर्थन मिळत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, कालपर्यंत फोगट हिला सुवर्णपदकाचा दावेदार समजले जात होते आणि आज तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. ही बाब निश्चितच संशयास्पद आहे. विनेश फोगट हिने फायनलमध्ये आपली जागा मिळवली होती. ती पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक मारणारी पहिली कुस्तीपटू ठरली होती. विनेशने ५० किलो वजनी गटात उपांत्य फेरीत चार शून्यने जिंकून आपले सुवर्णपदक निश्चित केले होते. पण आज तिला घोर निराशेच्या अंध:कारात जावे लागले आहे. उपांत्य फेरीत तिने क्यूबाची कुस्तीपटू गुजमन लोपेझ हिच्यावर ५-० ने मात केली होती. फोगट ही हरियाणाची आहे आणि ती अशा परिवारातून येते जिथे कुस्ती ही तिच्यात रक्तातच आहे. ती पैलवा राजपाल फोगट यांची कन्या आहे आणि जिची चुलत बहीण बबीताने दंगल जसा ब्लाक बस्टर चित्रपटाला प्रेरणा दिली होती. मोठी होत असतानाचा विनेशच्या कुटुंबाला कुस्तीमध्ये येण्यासाठी सामाजिक दबावाचा सामना करावा लागला होता. पण आज तिच्या स्वप्नांचा भंग झाला आहे. तिचा सुवर्णपदकाचे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. यात कुणाला दोष सध्या तरी देता येणार नाही. पण पॅरिस ऑलिम्पिकच्या नियमांनी तिचा बळी घेतला आहे असे मात्र म्हणावे लागेल. पूर्ण देशात या बातमीने संताप आणि विद्रोह व्यक्त होत आहे. हे षडयंत्र असावे असा समज पसरू लागला आहे. लोकांचे तर असेही म्हणणे आहे की, केवळ १०० ग्राम वजन जास्त झाल्यामुळे तिला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या बाहेर करणे हे दुःखद आहे. या प्रकरणी आता देशात निदर्शने केली जात आहेत. संसदेतही या विषयावर हंगामा झाला असून अनेकांनी क्रीडा मंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे. समाजमाध्यमांवरही लोकांच्या भावनाचे प्रकरीकरण होत असून त्यात विनेशला जबरदस्त पाठिंबा दिला जात आहे, तर काहींनी सरकारने यात दखल देण्याची मागणीही केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनेशचे वर्णन चम्पियन ऑफ चॅम्पियन असे केले आहे. पण या प्रकारामुळे भारताच्या कीडाजगतातील ओळखीला मोठा धक्का बसला आह. मोदी यांनी फोगट हिचा गौरव करताना तिला आपण भारताचा गौरव आहात असे म्हणून तिचा होसला वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. आज रात्री तिची स्वर्णपदकासाठी लढत होणार होती. पण तत्पूर्वीच तिच्याबाबतीत वजन जास्त असल्याने तिला खेळता येणार नाही अशी बातमी आली आणि भारतावर संपूर्ण निराशेचे सावट पसरले. फोगट हिची तर निराशा झालीच पण तिच्यासमवेत करोडो भारतीयांची घोर निराशा झाली आहे. कारण कुस्तीमध्ये भारताने इतकी मोठी मजल यापूर्वी कधीही मारली नव्हती. विनेशला आता या आव्हानाचा सामना करावा लागेल आणि पुन्हा तिला नव्याने या क्षेत्रात काही तरी असेच चमकदार करून दाखवावे लागेल. तरच तिच्यावर असलेले संकट दूर होईल. तिच्या प्रशिक्षकांनी सांगितले की, सकाळी तिचे वजन १०० ग्रामपेक्षा अधिक नोंदले गेले. पूर्ण रात्रभर तिच्या टीमने संपूर्ण वेळ न झोपताही जे प्रयत्न केले त्यांचा काहीही उपयोग झालेला नाही. हा साराच प्रकार अविश्वसनीय आहे आणि तिच्याबाबतीत दुर्दैवी आहेच. पण भारतीयांसाठी त्यापेक्षाही जास्त दुर्दैवी आहे. या बाबतीतून विनेशला लवकरात लवकर संकटातून बाहेर पडण्याची शक्ती येवो हीच प्रार्थना आज करोडी भारतीय करत असतील.