Food Poisioning: फूड पॉईझनिंग झाल्यावर काय करावे, घ्या जाणून

मुंबई: जर काहीही खाल्ल्यावर पोटदुखीचा त्रास , दर अर्ध्या तासाला उलटी-जुलाब, जेवण न पचणे, डोकेदुखी, अधिक थकवा असे वाटत असेल तर फूड पॉईझनिंगची लक्षणे असू शकतात.


फूड पॉईझनिंग एक प्रकारचे इन्फेक्शन असते जे बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगस पसरू शकते. जेव्हा बॅक्टेरिया अथवा फंगसने संक्रमण झालेले पदार्थ कोणी खात असेल तर हे बॅक्टेरिया पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना मारतात. यामुळे पचनक्रिया बिघडते. खराब पाणी, एक्सपायर झालेले पॅकेज्ड फूड, बराच वेळ बनवून ठेवलेले खाणे खाल्ल्याने त्रास होतो.


३२ ते ३५ डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक तापमान झाल्यास बॅक्टेरिया आणि फंगस निर्माण होऊ लागतात. अनेक अभ्यासाअंती हे समोर आले आहे की ३७ डिग्रीपेक्षा अधिक तापमान बॅक्टेरिया आणि फंगससाठी अनुकूल असते.


याचकारणामुळे अधिक उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दिवसांत जेवण लवकर खराब होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे ताजे जेवण जेवण्याचा सल्ला दिला जातो.


आरोग्य तज्ञांच्या मते जर काहीही खाल्ल्यानंतर पोटात खूप दुखत असेल, दर अर्ध्या तासाला उलटी तसेच जुलाब होत असतील, डोकेदुखी, अधिक थकवा आणि कमजोरी जाणवत असेल तर फूड पॉईझनिंगची लक्षणे असू शकतात.


जर काहीही खराब खाल्ल्याने उलटी-जुलाबसोबत ताप, सतत उलटी होणे, उलटीद्वारे शरीरातील पाणी कमी होणे, तोंड सुकत राहणे, शरीरावर रॅशेस येणे अशा प्रकारच्या समस्या तीन दिवसांपेक्षा दिसत असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जा.

Comments
Add Comment

Sleep : गाढ आणि शांत झोपेसाठी या ५ टिप्स नक्की फॉलो करा!

मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जीवनात, ताणतणाव आणि इतर अनेक कारणांमुळे बऱ्याच लोकांना रात्री शांत झोप लागत नाही.

Health: प्रोटीनचा उत्तम स्रोत! 'या' ५ ड्रायफ्रूट्समुळे मिळेल भरपूर प्रोटीन

मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी प्रोटीन अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रोटीन

Sleep: शांत झोप हवी आहे? 'या' ५ फळांमुळे मिळेल गाढ झोप!

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात चांगली आणि पुरेशी झोप मिळवणं अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. अपुरी झोप अनेक

शाकाहारी लोकांसाठी 'ड' जीवनसत्वाची कमतरता भरून काढणारे पदार्थ

मुंबई : शरीराला निरोगी ठेवण्यासाठी 'ड' जीवनसत्व (Vitamin D) अत्यंत महत्त्वाचे असते. शरीरातील हाडांची मजबुती,

Health: भोपळ्याच्या बिया आणि खजूर, झोपेसाठी उत्तम आहार

मुंबई : रात्री शांत आणि गाढ झोप लागणे हे आजच्या धावपळीच्या जीवनात एक मोठे आव्हान बनले आहे. अनेक जण निद्रानाश आणि

उकडीचे मोदक

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे गणेशोत्सवात पारंपरिक उकडीचे मोदक तर आपण सगळेच करतो, पण जरा हटके वाटेल असे सुंदर