रत्नागिरी : १०० कोटी खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेने (Sachin Vaze) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, त्याचे पुरावे सीबीआयकडे दिल्याचे सचिन वाझेने म्हटलं. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिल्याचं आणि या पत्रात जयंत पाटील यांचंही नाव असल्याचं सचिन वाझे याने म्हटलं आहे. यावर आता राजकारण्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील यावर आपली भूमिका मांडली आहे. ‘सचिन वाझे यांनी खरं बोलायला सुरुवात केली आहे. ते जसं जसं बोलतील, तसं तसं मविआचं वस्त्रहरण होईल’, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
नितेश राणे म्हणाले, सचिन वाझे महाविकास आघाडीचा कलेक्शन एजंट होते. मविआचे असंख्य नेत्यांना सचिन वाझे हा ओसामा बिन लादेनपेक्षाही कमी वाटायचा. आता सचिन वाझेंनी सत्य बोलायला सुरुवात केली आहे. पैसे कसे घ्यायचे, वसुली कशी व्हायची, कोणाच्या माध्यमातून व्हायची या सगळ्याची सत्य परिस्थिती ते सांगत आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांनी हिंमत असेल तर समोर येऊन खुलासा करावा, असे आव्हान नितेश राणे यांनी अनिल देशमुखांना दिलं आहे.
ते पुढे म्हणाले की, सचिन वाझे यांना दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या खुनासंदर्भातही माहिती आहे. सचिन वाझे स्वतः लॅपटॉप आणि अन्य पुरावे गोळा करण्यासाठी सुशांत सिंग राजपूतच्या घरी गेला होता. ८ जूनच्या रात्री जी मर्सिडीज गाडी दिशा सालियनच्या खुनासाठी वापरली गेली होती, ती सचिन वाझेचीच होती, अशी माहिती पण आमच्याकडे आहे. त्यामुळे हा विषय फक्त अनिल देशमुखांचा नसून यापुढेही वाझे जसं जसं बोलत जातील, तसं तसं महाविकास आघाडीचे वस्त्रहरण होईल, असं नितेश राणे म्हणाले.
त्यांनी शिवसंकल्प नाव ठेऊ नये, अली संकल्प मेळावा नाव ठेवावे. अली संकल्प मेळावा त्यांच्यासाठी जास्त सोयीस्कर नाव आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाविकास आघाडीतील सर्वांच्या कुंडल्या आहेत. फडणवीस मैदानात उतरले तर त्यांना महाराष्ट्रात चेहरा दाखवायला जागा उरणार नाही, असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी दिला आहे.
माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. सीबीआयकडे देखील त्याचे पुरावे आहेत. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. सुनावणी त्यांच्या विरोधात गेली आहे. देवेंद्र फडणवीसांना देखील या संदर्भात मी पत्र लिहिले आहे. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे. मी एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये जयंत पाटील यांचे नाव असल्याचे सचिन वाझेंनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…