Nashik crime : नाशिकमध्ये दिवसाढवळ्या हत्याकांड! लोखंडी रॉडने सपासप १३ वार करत तरुणाला संपवलं

हल्ल्याचे कारण मात्र अस्पष्ट; पोलिसांचा तपास सुरु 


नाशिक : पुण्याप्रमाणेच आता नाशिकमध्येही गुन्हेगारीचे (Nashik Crime) प्रमाण वाढताना दिसत आहे. नाशिकमध्ये भरदिवसा दुचाकीवरुन जाणाऱ्या एका इसमाची तीन ते चार अज्ञात लोकांनी हत्या केल्याचा (Murder case) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या हत्येचे कारणही अद्याप समजू शकलेले नाही. प्रमोद वाघ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून एकूण तिघांनी त्याच्यावर हल्ला केला होता. काल संध्याकाळच्या सुमारास झालेल्या या घटनेने नाशिक परिसरात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकरोड सिन्नर फाटा परिसरातील यश टायर्स या दुकानासमोर ही घटना घडली. ३८ वर्षीय प्रमोद रामदास वाघ हे सायंकाळी सहाच्या सुमारास सर्व्हिस रोडने दुचाकीने जात होते. यावेळी संशयित योगेश पगारे आणि त्याच्या साथीदारांनी प्रमोद यांना अडवलं. त्याने जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी एकाने प्रमोद याच्यावर रॉडने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. वार वर्मी लागल्यामुळे ते जागेवर कोसळला. आरोपी योगेश पगारे याने एकापाठोपाठ एक असे १३ वेळा लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात वार केला. सोबत असलेल्या मित्राने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण तो काही ऐकण्याच्या परिस्थितीतच नव्हता.


या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्याचा सीसीटीव्ही सध्या समोर आला असून हल्लेखोर अत्यंत निर्घृणपणे प्रमोद वाघ यांच्यावर हल्ला करताना दिसतोय. प्रमोद वाघ यांच्यावर हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला. तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रमोद वाघ यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रमोद वाघ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.



पोलिसांचा तपास सुरु


हा हल्ला नेमका कशामुळे घडला याची अद्याप माहिती समजू शकलेली नाही. घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे कर्मचारी हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.


Comments
Add Comment

महामुंबईची भटकंती आता एकाच तिकिटावर

एकाच 'मुंबई वन'ॲपमध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट मुंबई : मुंबईसह उपनगरातील

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

इन्स्टा स्टार मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार ?

नवी दिल्ली : बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या. त्यातच उमेदवार म्हणून मिथिलामधून

आधी साठ कोटी जमा करा, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

व्यावसायिक राज कुंद्रा आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी या दोघांवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा

वारंवार पेनकिलर घेत असाल तर आधी हे वाचा !

मुंबई : थंडीच्या दिवसात हवामानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचा अनेकांच्या तब्येतीवर परिणाम होतो. अंगदुखी, ताप

हार्दिक पंड्याच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये Lamborghini Urus SE ची एन्ट्री

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतंच त्याने आपल्या कार कलेक्शनमध्ये Lamborghini