Tuesday, April 22, 2025
Homeदेशप्रीती सुदान उद्या स्वीकारणार यूपीएससीच्या अध्यक्षपदाचा कारभार

प्रीती सुदान उद्या स्वीकारणार यूपीएससीच्या अध्यक्षपदाचा कारभार

नवी दिल्ली : पूजा खेडकर वादात मनोज सोनी यांच्या राजीनाम्यानंतर प्रीती सुदान यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) हा वादाच्या केंद्रस्थानी आहे. देशात पूजा खेडकर प्रकरण गाजत असतानाच यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी आता प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रीती सुदान १ ऑगस्टपासून यूपीएससीच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारणार आहेत. एप्रिल २०२५ पर्यंत त्या या पदावर असतील.

प्रीती सुदान या १९८३ च्या बॅचच्या आंध्र प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी आहेत. सुदान या माजी केंद्रीय आरोग्य सचिव होत्या. जुलै २०२२ मध्ये त्या निवृत्त झाल्या. यापूर्वी त्यांनी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग आणि महिला आणि बाल कल्याण आणि संरक्षण मंत्रालयात सचिव म्हणून काम केले आहे.

आतापर्यंतच्या कारकिर्दीत, सुदान यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि आयुष्मान भारत सारखे प्रमुख कार्यक्रम ठिकठिकाणी राबवले. नॅशनल मेडिकल कमिशन, अलाईड हेल्थ प्रोफेशनल्स कमिशन आणि देशात ई-सिगारेटवर बंदी आणण्यासाठी कायदा आणण्यातही उल्लेखनीय योगदान दिले.

यूपीएससीच्या चेअरपर्सन होणाऱ्या सुदान या दुसऱ्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. याआधी १९९६ साली आर. एम. बॅथ्यू यूपीएससीच्या चेअरपर्सन म्हणून नियुक्त झाल्या होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -