Sunday, April 27, 2025
Homeताज्या घडामोडीPooja Khedkar : पूजा खेडकरची उमेदवारी रद्द; भविष्यात यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षेस बसण्यास...

Pooja Khedkar : पूजा खेडकरची उमेदवारी रद्द; भविष्यात यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षेस बसण्यास बंदी!

नवी दिल्ली : गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असणाऱ्या पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची उमेदवारी केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने अखेर रद्द केली आहे. आधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन व त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेली कथित अनियमितता या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांची उमेदवारी यूपीएससीने रद्द केल्याचे समजते. विशेष म्हणजे यापुढे यूपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये (UPSC exam) पूजा खेडकर यांना बसता येणार नाही, असेही यूपीएससीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

यूपीएससीने पूजा मनोरमा दिलीप खेडकर (Pooja Khedkar) यांना दिलेली प्रोव्हिजनल उमेदवारी रद्द केली आहे. पूजा खेडकर यांनी सनदी सेवेत निवड होताना त्यांच्या दिव्यंगत्वाबाबत चुकीची कागदपत्रे सादर केल्याचाही आरोप करण्यात आला. शिवाय, त्यांच्या वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही त्यांनी ओबीसी क्रिमी लेअर सुविधेचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, यासाठी त्यांनी परीक्षेसाठी अर्ज करताना नावामध्येही वारंवार बदल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी याचबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा उल्लेख न्यायालयातील सुनावणीमध्ये करण्यात आला. तसेच पूजा खेडकर यांच्या पालकांचा घटस्फोट झालाय की नाही? याचीही चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे वडील दिलीप खेडकर वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढले होते. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता ४० कोटींहून अधिक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांना क्रीमीलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच पालकांचा घटस्फोट झाला असून आपण आईकडे राहतो, त्यामुळे आपले उत्पन्न कमी आहे, असा पूजा खेडकर यांचा दावा समोर आला. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, गुरुवारी म्हणजेच १ ऑगस्ट रोजी प्रीती सुदान पदभार स्वीकारणार आहेत. मात्र, त्यांनी पदभार स्वीकारण्याच्या आदल्या दिवशी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्यावर यूपीएससीने कारवाईचा बडगा उगारला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -