देशभर पूर्वांचलातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी अनेक वसतिगृह सुरु झाली. त्यापैकी महाराष्ट्रात १९९५-९६ साली पुण्यात मेघालयातील मुलींसाठी पहिले वसतिगृह सुरु झाले. वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात जनकल्याण समितीमार्फत ईशान्येकडल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या वसतिगृहातून पाचवी ते बारावी पर्यंतची मुलं राहतात. बारावीनंतर पुण्यात शिक्षणाच्या संधी जास्त दिसून येतात. अगदी सुरुवातीला टिळक रोडवर दान मिळालेल्या २ खोलीतून या वसतिगृहाला सुरुवात झाली त्यानंतर त्याच्या शेजारीच दोन खोल्या आणखी एका दानशूर व्यक्तीने वापरायला दिल्या. त्यानंतर त्याच ठिकाणी आणखी एक तीन खोल्यांची जागा घेऊन आता या सहा-सात खोल्यांमध्ये वसतिगृह व्यवस्थित सुरू आहे.
ईशान्यकडच्या सात राज्यांमध्ये आता खूपच मोठ्या प्रमाणात विकासाची पावलं उचललेली दिसून येत आहेत; परंतु स्वातंत्र्यानंतरच्या काही काळात इथे भौगोलिक, आर्थिक, सामाजिक अनेक प्रश्न उभे होते. निसर्ग संपन्न असलेल्या या राज्यांकडे देशाच्या खूपच टोकाला असल्यामुळे उर्वरित भारताचं विशेष लक्ष जात नसे किंवा तिथे सहजपणे विकास पोहोचत नसे त्याशिवाय तिथला समाज अनेक जनजातींमध्ये विभागलेला आहे. त्यामुळे त्यांचे इतरही अनेक प्रश्न, समस्या होत्या. संघाचं काम हे संपूर्ण राष्ट्राच्या विकासासाठीच कटिबद्ध असल्यामुळे संघाने या सात राज्यांमध्ये सुद्धा काम करायचं ठरवलं.
१९७२ साली प्रचारक असलेले कै. शंकर दिनकर तथा भय्याजी काणे मणिपूरमधील उख्रुल जिल्ह्यातील न्यू तुसोम या सरहद्दीवरच्या गावात जाऊन राहिले. तिथे ते एका शाळेत शिक्षक म्हणून काम करु लागले. त्या शाळेतील मुलांमध्ये प्रेम व विश्वास निर्माण करुन पुढील शिक्षणासाठी पालकांची परवानगी घेऊन सुरुवातीला सांगली येथील संघ कार्यालयात राहण्याची व्यवस्था करुन त्या मुलांच्या शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष भारत दर्शन घडवून देशाची ओळख त्यांनी करून दिली.
हा प्रयोग यशस्वी झालेला पाहून देशभर पूर्वांचलातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी अनेक वसतिगृह सुरु झाली. त्यापैकी महाराष्ट्रात १९९५-९६ साली पुण्यात मेघालयातील मुलींसाठी पहिले वसतिगृह सुरु झाले. सुरुवातीला दोन-तीन कार्यकर्त्यांच्या घरी या मुलींना राहायची व्यवस्था करण्यात आली होती. सुरुवातीला काही वर्ष पाचवीतील लहान मुली इथे राहत असतं; परंतु नंतर पुण्यातील छात्रावासात बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींची सोय करायची असं ठरलं. वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात जनकल्याण समितीमार्फत ईशान्येकडल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या वसतिगृहातून पाचवी ते बारावीपर्यंतची मुलं राहतात. बारावीनंतर पुण्यात शिक्षणाच्या संधी जास्त दिसून येतात. त्यामुळे या मुलां-मुलींना बारावीनंतर पुण्यात राहायची सोय व्हावी यासाठी अगदी सुरुवातीला टिळक रोडवर दान मिळालेल्या २ खोलीतून या वसतिगृहाला सुरुवात झाली. त्यानंतर त्याच्या शेजारीच दोन खोल्या आणखी एका दानशूर व्यक्तीने वापरायला दिल्या. त्यानंतर त्याच ठिकाणी आणखी एक तीन खोल्यांची जागा घेऊन आता या सहा-सात खोल्यांमध्ये वसतिगृह व्यवस्थित सुरू आहे. सध्या सुचित्राताई शिर्के प्रकल्प प्रमुख म्हणून काम पहात आहेत. साधारणतः दरवर्षी इथे पंधरा मुली निवासासाठी असतात. त्याशिवाय इतर छात्रावसातील मुलींना पुण्यात काही काम असेल तर त्याही इथे येऊन राहून जातात. इथे आलेल्या मुलींना हवं असेल तर कौन्सिलिंग केलं जात. त्यांची आवड, बुद्धिमत्ता पाहून त्यांनी कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यावं यासाठी मार्गदर्शन केलं जात. अधिक तर मुलींना बीएड करण्यात स्वारस्य असतं कारण परतल्यानंतर त्यांना त्यांच्या गावात नोकरी उपलब्ध होऊ शकते. अशा प्रकारे अनेक मुलींना आज मेघालयात शिक्षिकेची नोकरी मिळाली आहे. आत्तापर्यंत गेल्या २८ वर्षांत इथून अंदाजे चारशे मुली शिकून आपापल्या गावांमध्ये परतल्या आहेत व तिथे नोकरी धंदा, सामाजिक कार्य करत आहेत किंवा अन्यत्र नोकरीसाठी गेल्या आहेत. पुण्यातील छात्रावासात नागालँड, मेघालय, मणिपूरच्या पहाडी भागातील मुली राहतात.
ईशान्यकडच्या भागातील लोकांचा आहार वेगळा असतो. त्या भात, मांसाहार जास्त खातात. पोळी हा प्रकार त्यांना विशेष आवडत नाही. त्यामुळे त्यांना आठवड्यातून एकदा मांसाहारी जेवण तसंच अंडी, फळं, भाज्या असा आहार दिला जातो. एक मुलगी फुटबॉलमध्ये चांगली कामगिरी करत होती. त्यामुळे तिला क्रीडापटूप्रमाणे पौष्टिक आहारही दिला जात असे. छात्रावासातर्फे समाजातील दानशुरांना आवाहनही केलं जातं की इथल्या मुलींसोबत तुम्ही घरातील एखादा वाढदिवस किंवा चांगलं कार्य साजरे करा. त्यानिमित्ताने या मुलींना वेगळा आहार तसंच वेगळ्या माणसांनाही भेटता येत. ईशान्यकडच्या राज्यातून इथे आलेल्या मुला-मुलींची एकमेकांशी ओळख व्हावी तसेच त्यांनी आपले अनुभव सांगावे त्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रातल्या सर्व छत्रावासातील मुलांचं एक गेट टूगेदर आयोजित केलं जातं. त्यावेळी त्यांच्या समस्या देखील ऐकून घेतल्या जातात आणि त्यांची सोडवणूक केली जाते. आजवर डॉक्टर्स, इंजिनियर्स, एल.एल.एम. तसेच अनेक विद्यार्थी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून गेले आहेत. डार्लिन एम कॉम करून ती अ.भा.वि.प.ची मेघालय प्रांत संघटन मंत्री म्हणून पूर्ण वेळ काम करत आहे. पुण्यातील छत्रावासात राहून गेलेली डेलिना नावाची विद्यार्थिनी एलएलबी, एलएलएम शिक्षण पूर्ण केल्यानंतर मेघालयात परतली. तिथे तिने स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली आणि त्याचबरोबर तिच्यासारख्या अनेक यशोगाथांवर आधारित पुस्तकाचं तिथल्या भाषेत रूपांतर करून ते प्रकाशित केलं. तिचं हे काम पाहून प्रकाशन समारंभाला खुद्द सरसंघचालक मोहनजी भागवत उपस्थित होते. तिच्या ईशान्यकडच्या महिलांसाठीच्या कामाची, बुद्धिमत्तेची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आयोगाच्या समितीमध्ये सदस्य म्हणून तिची निवड करण्यात आली आहे. ईशान्यकडच्या युवक-युवतींसाठी अजून काम वाढवायचं असेल तर जागेची आवश्यकता आहे त्या दृष्टीने ही यासाठी वसतिगृहातर्फे प्रयत्न सुरू आहेत. ‘थेंबे थेंबे तळे साचे ‘ असे आपण म्हणतो त्यानुसारच इथे राहणाऱ्या मुलींची संख्या कमी असली तरी त्यांच्या माध्यमातून भारतीयत्वाची भावना ईशान्यकडे पोहोचवण्यासाठी एक पायवाट यशस्वीपणे वसतिगृह चालत आहे हे नक्की.
joshishibani@yahoo. com
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…