Mumbai News : लालबागमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट! ४ जण गंभीर जखमी

Share

लालबाग : दोन दिवसांपूर्वी मुंबईतील (Mumbai) विक्रोळी (Vikhroli) येथे गॅस सिलिंडरचा स्फोट (Gas Cylinder Blast) झाल्याची घटना घडली होती. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून आणखी एक जण गंभीर जखमी झाला होता. मुंबईतील सिलिंडर स्फोटाचे हे प्रकरण ताजे असताना पुन्हा आणखी एक अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास मुंबईमधील लालबाग परिसरात गॅस सिलिंडरचा (Lalbaug Cylinder Blast) स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये ४ जण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र सदरच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लालबागच्या डॉ. एस. एस राव रोडवरील मेघवाडी बिल्डिंग क्रमांक ३ मध्ये ही घटना घडली. या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या राणे यांच्या घरामध्ये पहाटे ५ च्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे घराला मोठी आग लागली असून यामध्ये घरातील साहित्य, कपडे जळून खाक झाले. तसेच या स्फोटामध्ये चौघे जण जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ही आगीवर नियंत्रण मिळवले.

जखमींची माहिती

गॅस सिलिंडरच्या स्फोटामध्ये एक महिला आणि तिची दोन मुले यांसह आणखी एक व्यक्ती जखमी झाले. कुंदा मिलिंद राणे (४८ वर्षे) ही महिला या स्फोटामध्ये ७० ते ८० टक्के जखमी झाली आहे. अथर्व मिलिंद राणे (१०) आणि वैष्णवी मिलिंद राणे (१०) हे १५ ते २० टक्के जखमी झाले आहेत. तर अनिकेत विलास डिचवलकर (२७) हा तरुण ६० ते ७० टक्के जखमी झाला आहे. यामधील कुंदा राणे आणि त्यांच्या दोन मुलांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अनिकेत डिचवलकरवर मसीना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

Recent Posts

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

29 minutes ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

29 minutes ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

31 minutes ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

44 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

48 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

1 hour ago