मुंबई : श्रावण (Shravan) महिना हा हिंदू धर्मीयांसाठी पवित्र महिन्यांपैकी एक आहे. यंदा महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना येत्या सोमवारपासून म्हणजे ५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. श्रावण महिन्याच्या या कालावधीत अनेक घरात कटाक्षाने मांसाहार टाळला जातो. त्यामुळे मांसाहार खवय्यांची श्रावण सुरु होण्याआधी केल्या जाणाऱ्या गटारीसंदर्भातील नियोजनांची सुरुवात झाली आहे. मात्र या खवय्यांना यंदाची गटारी मासळी विनाच काढावी लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या बाजारामध्ये मासळीची आवक कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यासोबत येत्या गटारीच्या पार्श्वभूमीवर बाजारात उपलब्ध असणारी मासळींची मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे मासळीचे भाव गगनाला भिडत चालले आहेत. त्यामुळे आधीच भाज्यांचे दर वाढलेले असतनाच आता मांसाहारही महाग झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे.
दरम्यान, १ ऑगस्टपासून बोटी पुन्हा समुद्रात जातील त्यावेळीच सर्वसामान्यांना ताजे मासे स्वस्त दरात मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र यासाठी किमान १५ दिवसांची तरी वाट पहावी लागणार आहे. परंतु यावेळी श्रावण सुरु असल्याने अनेकांना मास्यांची भूक श्रावणानंतरच शमवता येईल असे चित्र दिसत आहे.
मासळीचे भाव वाढण्यापूर्वी सुरमई ४०० रुपयांना विकली जायची. परंतु ती आता चक्क हजार रुपयाला मिळत आहे. कोळंबीचे भाव ३८० वरुन ६०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे पापलेटची किंमत ८०० ते हजार रुपयांवरुन थेट १३०० रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे बोंबिलची किंमतही २०० ते २५० रुपयांवरुन ७०० रुपयांवर पोहोचली आहे. तर पाच नग बांगड्यासाठी २०० रुपये मोजावे लागायचे ते आज ३ नगासाठी २०० रुपये आकारले जात आहेत. वाम ४०० ते ५० रुपयांवरुन हजार रुपयांवर तर हलवा आणि रावस यांचे दर ३५० ते ४०० रुपयांवरुन ८०० रुपयांवर पोहचले आहेत.
सध्या मुंबईमध्ये मासेमारी बंद आहे. मात्र गुजरात, हावडा बंदर, पोरबंदर येथून मासे मुंबईबरोबर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये दाखल होत आहेत. परंतु हा सर्व आधी साठवून ठेवलेला माल असल्यामुळे सध्या बाजारात मासे महाग आहेत. त्यासोबत ट्रान्सपोर्टेशनदरम्यानही माल खराब होण्याचे प्रमाण बरेच असल्याने आणि पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याने याचा फटका मास्यांच्या पुरवठ्यावर बसला आहे.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…