Raj Thackeray : पुणे पूर परिस्थितीला जबाबदार कोण? : राज ठाकरे

Share

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पुणे शहरातील पूरग्रस्त भागाला भेट देत नागरिकांशी संवाद साधत त्यांना आधार दिला. सुमारे ४ तास वेळ देत जाणुन घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा त्यांनी ऐकुन घेतल्या. सिंहगड रस्ता भागातील निंबाज नगर ,एकता नगर भागाला भेट देत नागरिकांशी संवाद साधत राजसाहेबांनी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या नंतर पुलाच्या वाडीत पुराच्या पाण्यात विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या दोन तरुणाच्या घरी जाऊन त्याच्या कुतुबियाना धीर देत राजसाहेबांनी त्यांचे सांत्वन केले.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने शहरात पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे सोमवारीच धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, असा इशारा जलसंपदा विभागाने दिला होता. त्यानंतरही महापालिका निद्रिस्त राहिली आणि सिंहगड रस्त्यावरील एकतानगर भागातील चार हजार जणांना आपले संसार पाण्यात सोडावे लागले. इशारा देऊनही कृती न झाल्यानेच ही आपत्ती ओढावली. पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग दोघांमध्ये समन्वय नसल्याचे सिद्ध झाले. यावेळी राज यांनी प्रशासनावर टीका केली.

महानगरपालिका, प्रशासन, जलसंपदा विभाग आजपर्यंत सगळ्यांची मिळून एकही बैठक झाली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. जगभरात पाणी सोडणार असल्यास ते अलार्म सिस्टिमद्वारे कळवतात. मग आपल्याकडे काही घोषणा अथवा सूचना देऊन का कळवले नाही, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. यात झालेल्या अतोनात नुकसानीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पुणेकरांनी केला आहे. या वेळी मनसेचे सर्व महाराष्ट्र राज्य पातळीवरील व शहर पातळीवरील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Recent Posts

MI vs CSK, IPL 2025: मुंबई इंडियन्स मागील पराभवाचा वचपा काढणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…

20 minutes ago

लिंबू लोणचं

पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…

39 minutes ago

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर

पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…

50 minutes ago

भाषा हे राजकारण्यांच्या हातातले हत्यार नाही!

डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…

53 minutes ago

आदिवासी जमातीसाठी ती ठरली आरोग्यदूत

अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…

58 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २० एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…

1 hour ago