Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

मुंबई, ठाण्यात पावसाची उसंत, पाहा राज्यात काय आहे पावसाची स्थिती

मुंबई, ठाण्यात पावसाची उसंत, पाहा राज्यात काय आहे पावसाची स्थिती

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा कहर सुरू आहे. मुसळधार पावसामुळे तर पुण्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. बुधवारी तसेच गुरूवारीही पावसाचा जोर कायम राहिल्याने राज्यातील पुणे, ठाणे, मुंबईमध्ये जनजीवन अक्षरश: विस्कळीत झालं होतं. गेल्या ४८ तासांत पावसामुळे ५ जणांना आपला जीव गमवावा लागला.


पुण्यात पावसाने कहरच केला. धो धो कोसळणाऱ्या पावसाने पुण्यातील अनेक नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली. त्यामुळे पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.यामुळे पुणेकरांचे बेहाल केले. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने लोकांना स्थलांतरावाचून काही पर्यायच उरला नाही.


दरम्यान, मुंबईत गुरूवारी रात्रीपासून पावसाने थोडी उसंत घेतली आहे. हवामान विभागाने शुक्रवारी ठाणे तसेच मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केली होती. पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आळा आहे. तर रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.



पावसाची विश्रांती मात्र लोकलसेवा उशिराने


शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतली असली तरी लोकलसेवा उशिराने सुरू आहे. मध्य, पश्चिम तसेच हार्बर रेल्वेच्या प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. अनेक रेल्वेगाड्या उशिराने सुरू असल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसत आहे.

मुंबईसाठी गुड न्यूज


सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी ४ धरणे पूर्णपणे भरली आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणे विहार, मोडक सागर, तुळशी आणि तानसा हे तलावही ओसंडून वाहत आहेत

Comments
Add Comment