हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडले; पेण तालुक्यातील भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  300

हेटवणे धरणाच्या ६ दरवाज्यातून ५५ घमी / से एवढा पाण्याचा विसर्ग


पेण : पेण तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे हेटवणे धरण ९० टक्के भरले आहे. त्यामुळे हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडले आहेत. हेटवणे धरणाच्या ६ दरवाज्यातून ५५ घमी / से एवढा पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. हेटवणे धरणाचे दरवाजे उघडल्याने पेण तालुक्यातील भोगावती नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हेटवणे धरण भरल्याने पेण तालुका व नवी मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. हेटवणे धरणाची एकूण क्षमता १४७,४९ दशलक्ष घनमीटर एवढी आहे.


पेण तालुक्यात व धरण क्षेत्र परिसरात जोरदार पाऊस झाल्याने हेटवणे धरण भरले आहे. त्यामुळे या धरणाचे सहा दरवाजे २ फुटाने उघडले आहेत. दुपारी १ वाजता त्यातून ५५ घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे. सध्या पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने यावर प्रकल्प अधिकारी व सहायक अधिकारी लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता केवळ सतर्क राहणे गरजेचे आहे. धरणाचे दरवाजे केवळ सावधानता म्हणून उघडण्यात आले असल्याची माहिती हेटवणे धरणाचे उपविभागीय अभियंता आकाश ठोंबरे यांनी दिली आहे.


या पार्श्वभूमीवर पेणचे प्रांताधिकारी प्रवीण पवार व पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी खाडी व नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Comments
Add Comment

IND vs ENG Test 2: ४०७ धावांवर आटोपला इंग्लंडचा पहिला डाव, सिराजने घेतल्या ६ विकेट

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबेस्टनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. शुक्रवारी

"श्रीरंग" तर्फे गतिमंद विद्यार्थ्यांसाठी 'सितारे जमीन पर' सिनेमाचा विशेष खेळ

मुंबई : श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गतिमंद विद्यार्थ्यांसाठी लालबाग येथील जय हिंद सिनेमा गृहात आमिर खान

स्थानिक स्वराज्य संस्थांना 'एक टक्के' नोंदणी निधी थेट हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव!

प्रक्रिया अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार, महसूलमंत्र्यांची विधानसभेत

बोरिवली येथील खादी ग्रामोद्योग ट्रस्टला जमीन हस्तांतरण कायदेशीर

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधानसभेत स्पष्टीकरण मुंबई : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी

राज्याच्या समुद्रकिनारी असलेल्या कांदळवनांचे सर्वेक्षण सुरू

मुंबई: गुजरातच्या सीमेपासून ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत राज्याच्या समुद्रकिनारी कांदळवन आहेत. या

तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना – राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई: तळेगाव-दाभाडे येथे पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन जणांना पिस्तुल व जिवंत काडतुसांसह पकडले. चौकशीनंतर या