ठाणे : काही दिवसांपूर्वी अतिमुसळधार पावसाच्या फटक्यामुळे मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातील नाना चौकात रुबिनिसा मंझिल या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले होते. त्यानंतर आता आणखी एक असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
सध्या मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरुच आहे. अशातच मुंबई आणि ठाणे उपनगर परिसरात पावसाने जोर धरला असून मोठा फटका बसला आहे. ठाण्यातील लोकमान्य नगर येथील तुळजाभवानी निवास या इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.