मुंबई: अभिनेत्री नताशा स्टेनकोविक आणि स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या यांनी नुकतीच घटस्फोटाची घोषणा केली होती. हार्दिकने सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची माहिती शेअर केली होती. घटस्फोटानंतर नताशा आपल्या घरी सर्बियामध्ये आहे. यातच ती आपला मुलगा अगस्त्यला घेऊन फिरायला निघाली आहे.
नताशाने २४ जुलैला आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओ आणि काही फोटोज शेअर केले आहेत. यात अभिनेत्री आपल्या मुलासह अगस्त्यसोबत दिसत आहे. नताशा हार्दिक पांड्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अगस्त्यासह क्वालिटी टाईम घालवत आहे. आपल्या मुलाला घेऊन ती नताशासोबत एका झूमध्ये निघाली आहे.
अभिनेत्रीने सोशल मिडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट केले आहेत. तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये हॉर्ट इमोजी बनवला आहे. या फोटोंना चाहते लाईक्स करत आहेत. अभिनेत्रीने एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. नताशाच्या पोस्टवर हार्दिक पांड्यानेही कमेंट्स केल्या आहेत. भारतीय क्रिकेटरने एक नव्हे तर दोन दोन कमेंट केल्या आहेत.
हार्दिक पांड्याने एक कमेंट हॉर्ट आयचा इमोजी असलेला केला आहे. तर त्यातील एक कमेंट हार्ट इमोजीचा आहे. हार्दिक आणि नताशा दोघे मिळून आपल्या मुलाची काळजी घेत आहेत.