PM Narendra Modi : मध्यमवर्गीयांना ताकद देणारा, मागासवर्गीय, दलितांचं सक्षमीकरण करणारा अर्थसंकल्प!

  116

अर्थसंकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?


नवी दिल्ली : एनडीए सरकारच्या (NDA Government) तिसऱ्या कार्यकाळात आज केंद्रीय अर्थसंकल्प (Union budget 2024) सादर केला जात आहे. अर्थसंकल्पीय भाषणात हा अर्थसंकल्प गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यावर केंद्रित असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितलं आहे. तसेच यात अनेक तरतूदी करण्यात आल्या असून २०२४-२५ साठी एकूण खर्च ४८,२०,५१२ कोटी रुपये अपेक्षित आहे. या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'मध्यमवर्गीयांना ताकद देणारा, मागासवर्गीय, दलितांचं सक्षमीकरण करणारा हा अर्थसंकल्प' असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'मागील १० वर्षांत २५ कोटी लोक गरीबीशी झुंजत होते. आजचा खरा अर्थसंकल्प गरीबांसाठी आहे. या अर्थसंकल्पामधून असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत. शिक्षा आणि कौशल्यासाठी हा महत्वाचा अर्थसंकल्प आहे. मध्यमवर्गीयांना ताकद देणारा अर्थसंकल्प आहे. मागासवर्गीय, दलितांचं सक्षमीकरण करणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये अनेक योजना आहेत. या अर्थसंकल्पातून महिलांचं आर्थिक सक्षमीकरण होणार आहे. या अर्थसंकल्पातून छोट्या व्यापाऱ्यांना प्रगतीचा नवा मार्ग मिळेल, असंही ते म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'सरंक्षण दलाला आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक तरतुदी या योजनेत करण्यात आल्या. जगातील लोकांचं भारताप्रती आकर्षण वाढलं आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातून गरीब आणि मध्यमवर्गीयांना अनेक संधी उपलब्ध होतात. त्यामुळे या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रावरही भर देण्यात आला आहे.



नव्या करप्रणालीतून मिळणार दिलासा


यंदा करप्रणालीत गरीब आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यात आला आहे. तसेच स्टॅडंर्ड डिडक्शन देखील वाढवण्यात आला आहे. टीडीएसच्या नियमातही बदल करण्यात आले आहेत. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर अधिक लक्ष देण्यात आलं. छोट्या शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. तसेच मध्यमवर्गीयांना अन्नाची उपलब्धता होण्यासाठी होणार आहे, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.



अर्थसंकल्पात कोणत्या महत्त्वाच्या घोषणा?


पंतप्रधान मुद्रा योजनेसह, प्रधानमंत्री आवास योजना, MSME क्षेत्र यांबाबत काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह कॅन्सरवरील औषधं, सोलार पॅनल, सोने, चांदी, लिथिअम बॅटरी, इलेक्ट्रॉनिक वाहनं, चामड्याच्या वस्तू या सर्व गोष्टी स्वस्तात मिळणार आहेत. नव्या कररचनेनुसार ३ लाखांपर्यत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरावा लागणार नाही. त्यामुळे नवीन कररचना स्विकारलेल्यांना दिलासा मिळाला आहे.



अर्थसंकल्पातील घोषणा सविस्तर जाणून घेण्यासाठी यावर क्लिक करा -  




 


Comments
Add Comment

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने