Government Job : ईडीच्या विभागात काम करण्याची सुवर्णसंधी! 'या' पदांची मेगाभरती

मुंबई : भरघोस पगारासह सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ईडीने (ED) काही रिक्त पदांसाठी भरती (Recruitment) जारी केली आहे. त्यामुळे ईडीसारख्या मोठ्या विभागात काम करण्याची सुवर्णसंधी तरुणांना मिळणार आहे. सातत्याने सायबर गुन्हेगारीत (Cyber Crime) वाढ होत असल्यामुळे याप्रकरणाला आळा घालण्यासाठी ईडीने ४२ पदांची भरती जारी केली आहे.


ईडीने ४२ कॉम्प्युटर इंजिनियर नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये सात सिस्टीम अ‍ॅनालिस्ट तर इतर तांत्रिक सहकार्य कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी ईडीच्या संगणक प्रणालीसोबत काम करता येणार आहे. त्याचबरोबर पात्र उमेदवारांना सिस्टीम अ‍ॅनालिस्ट पदासाठी तब्बल ७० हजार रुपये तर तांत्रिक सहकार्य कर्मचाऱ्यांना ५५ हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे.



निवड प्रकिया


इंटरनेटच्या माध्यमातून होणारे व्यवहार, सायबर सिक्युरिटी सॉफ्वेअर, ई-मेल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या सर्व गोष्टी हाताळण्यासाठी या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. ही पदभरती तीन वर्षांच्या कंत्राटी पद्धतीने होणार आहे. नंतर हे नोकरीचे कंत्राट पाच वर्षांपर्यंत देखील वाढवण्यात येऊ शकते. सध्या ईडीतील काम हे संवेदनशील असल्याने उमेदवारांना गुप्तता करारावर सही करावी लागणार आहे. दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना देशातील विविध कार्यालयांमध्ये काम करण्याची संधी आहे.

Comments
Add Comment

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या