Ladki bahin yojana : केंद्राकडूनही लाडकी बहीण योजनेची घोषणा होण्याची शक्यता!

  92

निर्मला सीतारामन सादर करणार अर्थसंकल्प


नवी दिल्ली : मध्यप्रदेश सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहना योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६० वयोगटातील पात्रतेची पूर्तता करणाऱ्या महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. विधानसभेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली होती. यानंतर आता केंद्राकडून आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात देखील महिलांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. देशपातळीवर देखील लाडकी बहीण योजना सुरु होऊ शकते, असा अंदाज आहे.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज केंद्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी ३.० सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळेच यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष आहे. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी अर्थसंकल्पात कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव तरतूद केली जाणार आहे. यासह तरुण आणि महिलांच्या उत्थानासाठीही सरकार वेगवेगळ्या योजनांची घोषणा करू शकते. याचाच एक भाग म्हणून निर्मला सीतारामन लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



लखपती दीदी योजनेबाबतही घोषणा होण्याची शक्यता


या योजनेसह केंद्र सरकार लखपती दीदी या योजनेसंदर्भातही काही घोषणा करण्याची शक्यता आहे. सोबतच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारतर्फे भरीव आर्थिक तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. आंगणवाडी तसेच पोषण कार्यक्रमासाठी सरकार अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्याची शक्यता आहे.



ज्येष्ठ नागरिकांसाठीही होणार घोषणा?


केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी काही खास तरतूद केलेली नव्हती. त्यामुळे यावेळची सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकार आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती आणखी वाढवण्याची शक्यता आहे. ७० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या वृद्ध व्यक्तीलादेखील या योजनेचा फायदा देण्याची तरतूद सरकारतर्फे केली जाऊ शकते. तशी अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )