हायपरटेंशन म्हणजेच हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यामध्ये हिरवी वेलची फायदेशीर मानली जाते. एका संशोधनानुसार हाय बीच्या २० रुग्णांना जेव्हा वेलची पावडरचे सेवन करण्यासाठी दिले तेव्हा त्यांचा बीपी नॉर्मल आढळला.
हिरवी वेलची वजन वेगाने कमी करू शकते. हे खाल्ल्याने मेटाबॉलिज्म वेगाने वाढते. यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते. याच्या सेवनाने चरबी कमी होते आणि वजन वेगाने घटते.
वेलचीच्या दाण्यांच्या सेवनाने हाय ब्लड प्रेशर आणि शुगरपासून दिलासा मिळतो. अनेक रिसर्चमध्ये वेलची ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी आणि डायबिटीज मॅनेज करण्यात यशस्वी ठरली आहे.
वेलची भूक वाढवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. वेलची खाल्ल्याने पाचनतंत्र सुधारते आणि खूप भूक लागते.
वेलचीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड आणि लिव्हर एन्झाईम कमी होऊ शकतात. याचा लिव्हरच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो.