मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारं ‘तुळशी तलाव’ (Tulsi lake) हे पहिलं धरण ओव्हरफ्लो झालं आहे. आज सकाळी साडेआठ वाजता धरण पूर्ण भरुन वाहू लागलं. त्यामुळे आता मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी ‘तुळशी तलाव’ हे ८०४.६ कोटी लीटर अर्थात ८०४६ दशलक्ष लीटर उपयुक्त जलधारण क्षमता असणारं एक तलाव आहे. गेल्या वर्षी देखील हे तलाव २० जुलै २०२३ रोजीच मध्यरात्री १.२८ वाजताच्या सुमारास भरुन वाहू लागलं होतं. तर वर्ष २०२२ व वर्ष २०२१ मध्ये दिनांक १६ जुलै रोजीच ते ओसंडून वाहू लागलं होतं. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच वर्ष २०२० मध्ये दिनांक २७ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होतं.
बृहन्मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (1.8 कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली.
यंदाच्या उन्हाळ्यात भयंकर उकाड्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे आटत चालली होती. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात जून महिन्यातही फार कमी पाऊस झाल्यामुळे मुंबईकरांना पाण्याची चिंता सतावत होती. मात्र, आता जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने पाण्याचा प्रश्न मिटवला आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईला पाणीपुरवठा करणारे उर्वरित तलावही लवकरच भरतील, अशी आशा आहे. जेणेकरून मुंबईतील पाणी कपात रद्द होईल.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…