UPSC Chairman : मुदतपूर्तीआधीच यूपीएससी अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा!

Share

पूजा खेडकर प्रकरणाचा परिणाम?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) वादग्रस्त पद्धतीने चर्चेत आल्या आहेत. त्यांचे अनेक कारनामे दिवसेंदिवस उघडकीस येत आहेत, त्यातच त्यांच्या आईलाही अटक झाली आहे. तर यूपीएसने (UPSC) पूजा खेडकर यांची उमेदवारी का रद्द केली जाऊ नये असा सवाल उपस्थित करत पूजा खेडकरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच त्यांच्याविरोधात एफआयआरही (FIR) दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवरच आणखी एक मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी (Manoj Soni) यांनी मुदतपूर्तीआधीच आज तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे पूजा खेडकर प्रकरणाचा हा परिणाम आहे का, अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.

निवडीसाठी UPSC उमेदवारांकडून बनावट जात आणि अपंगत्व प्रमाणपत्र वापरण्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर यूपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा आल्याने भूवया उंचावल्या आहेत. मनोज सोनी, ज्यांनी मे २०२२ मध्ये UPSC चेअरपर्सन म्हणून पदभार स्वीकारला, त्यांच्या कार्यकाळात अजून पाच वर्षे बाकी आहेत. मनोज सोनी यांनी महिनाभरापूर्वीच आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला होता, मात्र त्यावर सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सोनी यांच्या राजीनाम्याचा सध्या सुरू असलेल्या वादाशी संबंध नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कशी आहे मनोज सोनी यांची कारकीर्द?

अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी, डॉ. सोनी यांनी २८ जून २०१७ ते १५ मे २०२३ पर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून काम केले. डॉ.सोनी यांनी तीन वेळा कुलगुरू म्हणून काम पाहिले. १ ऑगस्ट २००९ ते ३१ जुलै २०१५ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे (BAOU) कुलगुरू म्हणून सलग दोन टर्म आणि एप्रिल २००५ पासून महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बडोदाचे (एमएसयू ऑफ बडोदा) कुलगुरू म्हणून एक टर्म एप्रिल २००८ पर्यंत होते. बडोद्याच्या MSU मध्ये रुजू होताना डॉ. सोनी हे भारतातील सर्वात तरुण कुलगुरू होते.

सोनी यांनी नेमका का दिला राजीनामा?

वैयक्तिक कारणास्तव सोनी यांनी राजीनामा दिला आहे. अहवालात नमूद केले आहे की डॉ. सोनी यांना गुजरातमधील स्वामीनारायण संप्रदायाची शाखा असलेल्या अनूपम मिशनसाठी अधिक वेळ घालवायचा आहे.

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

23 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

1 hour ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

1 hour ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago