Pooja Khedkar : पूजा खेडकरांना मोठा धक्का! यूपीएससीने दाखल केलं एफआयआर

'तुमची उमेदवारी रद्द का केली जाऊ नये?' यूपीएसससीचा सवाल; बजावली कारणे दाखवा नोटीस


नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त असलेल्या पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही आहेत. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) पूजा खेडकर यांना चुकीची माहिती दिल्याबद्दल सिव्हिलची उमेदवारी रद्द का करू नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसंच पूजा खेडकर यांच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्याचा मोठा निर्णय यूपीएससीने घेतला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, यूपीएससीने पूजा खेडकर यांना नोटीस बजावून काही सवाल उपस्थित केले आहेत. तुमची उमेदवारी रद्द का केली जाऊ नये आणि यूपीएससीच्या भविष्यातील परिक्षांपासून तुम्हाला वंचित का ठेवलं जाऊ नये, असे सवाल विचारले आहेत. 'पूजा खेडकर यांची सखोल चौकशी करण्यात आली आहे. त्यांनी लोकसेवा आयोगाच्या २०२२ मधील परिक्षेत नियमांचं उल्लंघन केल्याचं त्यातून स्पष्ट झालं आहे. परीक्षा देण्यासाठी असलेल्या प्रयत्नांची मर्यादा त्यांनी पूर्ण केली होती. पण त्यानंतरही त्यांनी बोगस पद्धतीने आपली ओळख बदलून यूपीएससीची परीक्षा दिली. त्यांनी स्वत:चं नाव, वडिलांचं नाव, आईचा फोटो, स्वाक्षरी बदलली. याशिवाय मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पत्ताही बदलला. चुकीच्या पद्धतीनं ओळख बदलून त्यांनी मर्यादेपेक्षा अधिकवेळा परीक्षा दिल्या,' असं यूपीएससीने म्हटलं आहे.


UPSC आपल्या घटनात्मक आदेशाचे काटेकोरपणे पालन करते. कोणतीही तडजोड न करता योग्य परिश्रमाच्या शक्यतेच्या क्रमाने सर्व परीक्षांसह सर्व प्रक्रिया पार पाडते. UPSC ने अत्यंत निष्पक्षतेने आणि नियमांचे काटेकोर पालन करून सर्व परीक्षा प्रक्रियेचे पावित्र्य आणि अखंडता सुनिश्चित केली आहे. विशेषतः उमेदवारांकडून विश्वास आणि विश्वासार्हता मिळविली आहे. त्याला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही, असं UPSC ने स्पष्टपणे नमूद केलं आहे.



खेडकरांचा प्रशिक्षण कार्यक्रमही करण्यात आला रद्द


पूजा खेडकरांचा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय याच आठवड्यात घेण्यात आला आहे. उत्तराखंडच्या मसुरीतील लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांचा महाराष्ट्रातील प्रशिक्षण कार्यक्रम रद्द करुन त्यांना तातडीने माघारी बोलावलं. त्यासाठी पत्रही जारी करण्यात आलं. महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून याबद्दलची माहिती देण्यात आली होती. खेडकर यांना उद्यापर्यंत मसुरीला परत बोलावण्यात आलं आहे. पण अद्याप त्या तिथे पोहोचलेल्या नाहीत. त्यांचा मुक्काम वाशिममधील विश्रामगृहात आहे.



मानसिक आजार असल्याचं दाखवून तपासणीला मात्र टाळाटाळ


दृष्टीदोष आणि मानसिक आजार असल्याचं प्रमाणपत्र दाखवून यूपीएससी परीक्षा दिल्याचा आरोप पूजा खेडकरांवर आहे. प्रमाणपत्रांच्या आधारे सवलत मिळवून आयएएस झाल्याचे आरोप खेडकरांवर करण्यात आले आहेत. या सवलती मिळाल्या नसत्या, तर पूजा खेडकर आयएएस होऊ शकल्या नसत्या. दृष्टीदोष तपासण्यासाठी पूजा खेडकरांना एम्समध्ये बोलावण्यात आलं. वैद्यकीय तपासण्यांसाठी सहावेळा त्यांना बोलावलं गेलं. पण त्या हजर राहिल्या नाहीत. नानाविध कारणं देऊन त्यांनी वैद्यकीय तपासणीस टाळाटाळ केली. त्यांनी एका बाहेरील एजन्सीकडून एमआयआर रिपोर्ट आणला आणि तो जमा केला. पण तो स्वीकारण्यास यूपीएससीने नकार दिला. मात्र नंतर यूपीएससीने तो स्वीकारला.

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या