Saturday, August 30, 2025

Thane News : ठाणे जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचा ‘दुष्काळ’!

Thane News : ठाणे जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचा ‘दुष्काळ’!

रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ‘अतिरिक्त’ भार

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ व कल्याण या तालुक्यांतील विकासकामांबरोबरच येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे जबाबदारी ठाणे जिल्हा परिषदेच्या खांद्यावर आहे. जिल्हा परिषदेत तृतीय व चतुर्थ श्रेणीची एक हजार ७०० पदे रिक्त असल्याची बाब समोर आली असून, यामध्ये ८०० पदे ही शिक्षकांची रिक्त आहेत. ही रिक्त पदे न भरल्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ‘अतिरिक्त’ भार पडला असून जिल्हा परिषदेच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होत आहे.

शिक्षण, पाणीपुरवठा, बांधकाम, लघुसिंचन, कृषी, आरोग्यमध्ये पदे रिक्त

ठाणे जिल्हा परिषदेत ‘वर्ग २’ च्या अधिकाऱ्यांचीदेखील रिक्त पदांची जंत्री अधिक आहे. यामध्ये शिक्षण विभागातील मुख्याध्यापक (प्रा) ते केंद्र प्रमुखांची १९८ पदे रिक्त आहेत. त्यापाठोपाठ ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील २४, बांधकाम विभागातील १५, लघू सिंचनमधील १०, अर्थ आणि कृषी विभागातील प्रत्येकी ६, सामान्य प्रशासन विभागातील ३ तर, आरोग्य विभागातील साथरोग वैद्यकीय अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे.

Comments
Add Comment