अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नावर एटलीने बनवला खास सिनेमा

मुंबई: देशातील सगळ्यात मोठे बिझनेसमन मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी नुकताच विवाहबंधनात अडकला. अनंत अंबानीचे १२ जुलैला जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लग्न पार पडले. या दरम्यान देश-परदेशातील पाहुण्यांनी हजेरी लावली होती. बॉलिवूडच्या शहनशाह अमिताभ बच्चनपासून ते दक्षिणेचे दिग्दर्शक एटली कुमार हे या लग्नात सामील झाले होते.


आता अशी बातमी समोर येत आहे की अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी एटली कुमार यांनी १० मिनिटांची अॅनिमेटेड फिल्म बनवला आहे. याची माहिती एका यूट्यूबरने दिली आहे.



एटलीने बनवला सिनेमा, बिग बींचा आवाज


यूट्यूबरने सांगितले की लग्नाच्या दुसऱ्या दिवशी लग्नात आलेल्या पाहुण्यांसाठी १० मिनिटांचा एक सिनेमा रिलीज करण्यात आला. याला एटली यांनी दिग्दर्शित केले होते. हा एक अॅनिमेटेड सिनेमा होता आणि व्हॉईसओव्हर अमिताभ बच्चन यांनी केला होता.



१२ ते १४ जुलै दरम्यान होते कार्यक्रम


अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे कार्यक्रम १२ ते १४ जुलैदरम्यान रंगले होते. १२ जुलैला जोडप्याने सात फेरे घेतले होते. १३ जुलैला मंगल आशीर्वाद कार्यक्रम होता यात पंतप्रधान मोदीही आशीर्वाद देण्यासाठी आले होते. १४ जुलैला अनंत-राधिकाचा वेडिंग रिसेप्शनचा कार्यक्रम होता. यात अनेक बॉलिवूड स्टार पोहोचले होते.

Comments
Add Comment

Delhi Protest Reactions : सौरभ गोखलेचं विद्यार्थी आंदोलनावर भाष्य; 'शैक्षणिक मागण्या योग्य, पण...'

मुंबई : नीट परीक्षा पेपरफुटी (NEET Paper Leak Case) प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री (Union Education Minister) धर्मेंद्र प्रधान यांच्या

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या आरोग्याबाबत नवी चर्चा; ८३ व्या वर्षीही अनेक गंभीर आजारांचा सामना

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या प्रकृतीबाबत (Health Update) पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Shubha Godbole Cancer : मेधा मांजरेकर नंतर 'या' जेष्ठ अभिनेत्रीने केला 'केमो कर्ल्स'मधून आपल्या कॅन्सरचा उलगडा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी कॅन्सरशी

Eetha Movie : 'इठा' चित्रपटावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार! विठाबाईंच्या कुटुंबीयांचा संताप; म्हणाले, "इतिहासाची मोडतोड खपवून...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिच्या आगामी 'इठा' (Eetha) चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. हा

Star Pravah New Serial : 'आमच्या लाडक्या नाईक बाई' ऐश्वर्या नारकर यांचं ८ वर्षांनी स्टार प्रवाहवर पुनरागमन; नव्या मालिकेत साकारणार हाडाच्या शिक्षिकेची भूमिका

मुंबई : शाळा (School) म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते वर्गखोल्या (Classroom), फळ्यावरचं लेखन (Blackboard), प्रार्थना (Prayer), मधल्या

Ratris Khel Chale Actress : ‘रात्रीस खेळ चाले’च्या शेवंतांमध्ये नवा वाद! कृतिका तुळसकरने अपूर्वा नेमळेकरला ठणकावलं

मुंबई : ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale) या लोकप्रिय मालिकेतील ‘शेवंता’ (Shevanta) या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर