Kalki AD'2898 : बॉक्स ऑफिसवर कल्की एडी २८९८ चा जोर!

२० दिवसांत तब्बल ५८८ कोटींची कमाई


मुंबई : नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी’ (Kalki AD'2898) या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. कलियुगाचा भविष्यात होणारा अंत आणि त्यासाठी वाचवायला जन्म घेणाऱ्या कल्कीची कथा यात मांडण्यात आली आहे. अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण आणि प्रभास (Prabhas) या दिग्गज कलाकारांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. २७ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घातला आहे. तर हा धुमाकूळ अजूनही कायम असाच असल्याचे चित्र दिसून येत आहे. अवघ्या २० दिवसांत या चित्रपटाने तब्बल ६०० कोटींचा टप्पा गाठला आहे. हा टप्पा आणखी पुढे जाईल अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.



२० दिवसांत ५८८ कोटींची कमाई


या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ४१४.८५ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात 'कल्की 2898 एडी'चे कलेक्शन १२८.५ कोटी होते. रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तर आता या चित्रपटाचे ४.२५ कोटींची कमाई केली असल्याची माहिती मिळत आहे.



जवान चित्रपटाला मागे टाकणार?


'KGF २'ने ८५९.७ कोटी, RRR ने ७८२.२ कोटी, 'जवान'ने ६४०.२५ तर 'बाहुबली २'ने १०३०.४२ कोटींची कमाई केली आहे. त्यादरम्यान 'कल्की २८९८ एडी'ने कमाईच्या बाबतीत 'जवान'ला मागे टाकण्यासाठी अजून ६० कोटी रुपये कमवावे लागणार आहे.


दरम्यान, विकी कौशलचा 'बॅड न्यूज' हा चित्रपट १९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट काहीसा वेगळ्या जॉनरचा असल्याने 'कल्की'ला आता तिकिटबारीवर किती आव्हान मिळेल, हे रिलीजनंतरच स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत येत आहे 'सालबर्डी'

मुंबई : मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे.

"देऊळ बंद २" येतोय २१ मे रोजी

मुंबई : २०१५ साली प्रदर्शित झालेल्या "देऊळ बंद" चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि

मातृभूमी’मधील ‘चांद देख लेना’ गाण्याचा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित

मुंबई : सलमान खान फिल्म्स संगीतने सर्वांच्या आवडीच्या ‘चांद देख लेना’ या गाण्याचा एक विशेष पडद्यामागील व्हिडीओ

'मराठी माणसाच्या असंख्य आठवणींचे गाठोडे म्हणजे भारतमाता'

मुंबई : लालबाग, परळ आणि गिरणगावातील असंख्य मराठी माणसाच्या आठवणींचे एक मोठे गाठोडे घेऊन भारतमाता सिनेमागृह उभे

Bigg Boss Marathi 6 : शेवटची कॅप्टनसी कोणाला मिळणार ? प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चेर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले असून बिग