पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका या भाज्या, नाहीतर होऊ शकतात पोटासंबंधित आजार

  140

मुंबई: पावसाळ्याच्या दिवसांत वातावरण अतिशय हिरवेगार तसेच आल्हाददायक असते. मात्र यादिवसांमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते. या मोसमात अशा काही भाज्या खाऊ नयेत ज्यामुळे पोटाशी संबंधित आजार सतावू शकतात. या भाज्यांमध्ये किटाणू तसेच बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढतात त्यामुळे याचा पचनसंस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतात.



हिरव्या भाज्या


हिरव्या भाज्या जसे पालक, कोबी आणि सलाड सारख्या भाज्या लवकर दूषित होतात. यात किटाणू आणि किडे लवकर वाढतात. यामुळे पोटाशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो त्यामुळे पावसाळ्यात या भाज्या खाऊ नयेत.



मशरूम


पावसाळ्यात मशरूम खाऊ नयेत. मशरूम ओलाव्यामुळे लवकर खराब होतात. यामध्ये हानिकारक बॅक्टेरिया तसेच विषारी पदार्थ वाढू शकतात. यामुळे पोटाच्या समस्या तसेच आजार वाढण्याची शक्यता असते. याऐवजी तुम्ही दुधी भोपळा, तोंडली, भोपळा या भाज्यांचे सेवन करू शकता.



वांगी


पावसाळ्याच्या दिवसांत वांगी खाऊ नयेत. या मोसमात वांग्यामध्ये किडे तसेच बॅक्टेरिया लवकर वाढतात. यामुळे पाचनसंस्था बिघडू शकते.



फ्लॉवर


फ्लावरमध्ये पावसामुळे छोटे छोटे किडे तसेच बॅक्टेरिया होतात. हे धुवून जात नाहीत. तसेच पावसाळ्यात फ्लॉवर खाल्ल्याने पोटात गॅस तसेच अपचनाचा त्रास होऊ शकतो.

Comments
Add Comment

श्रावण महिन्यास उरलेत काही दिवस, पाहा कधीपासून सुरू होणार व्रत-वैकल्ये

मुंबई: आषाढी एकादशी आटोपली की, भाविकांना सण, उत्सवांचा महिना श्रावणाची चाहुल लागते. यंदा गुरुवार, २४ जुलैला आषाढ

हे तांदूळ खा , फिटनेस जपा !

मुंबई : आपल्या देशात अनेक प्रकारचा तांदुळ पिकवतात . भारतीय आहारात भाताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र, आधुनिक

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि