Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीपहिला विश्वासघात उद्धव ठाकरेंनीच केला!

पहिला विश्वासघात उद्धव ठाकरेंनीच केला!

ठाकरे-शं‍कराचार्यांच्या भेटीवरुन महंतांचे सवाल?

मुंबई : भाजपा (BJP) किंवा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नाही तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच हिंदू समाजाला धोका दिला आहे. २०१९ला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार होते. पण उद्धव ठाकरे यांनीच त्यांना धोका दिला, अशी जोरदार टीका महंत नारायणगिरी यांच्यासह आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केली आहे.

ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद (Jyotirmatha Shankaracharya Avimukteshwaranand) हे उद्धव ठाकरेंकडे गेले होते. शक्यतो साधारण व्यक्तींकडे ते जात नाहीत. मात्र अंबानींच्या विवाह सोहळ्यात आल्यानंतर त्यांनी ठाकरेंना भेट दिली. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना धोका दिल्याचे म्हटले. त्यावरून आचार्य प्रमोद कृष्णम आणि महंत नारायण गिरी यांनी परमपूज्य शं‍कराचार्यांनी विचारपूर्वक आणि समजून घेऊन बोलायला हवे, असे म्हटले आहे.

परमपूज्य शंकराचार्य यांच्यासह काशी-वाराणसीतून अनेक संत, महंत आणि धर्मगुरु मुंबईतील अंबानी कुटुंबीयांच्या लग्नसोहळ्यात आशीर्वाद देण्यासाठी आले होते. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येथील उपस्थित शंकराचार्यांचे आशीर्वादही घेतले होते. या लग्नसोहळ्यात उद्धव ठाकरेही सहकुटुंब उपस्थित होते. त्यामुळे, उद्धव ठाकरेंच्या निमंत्रणावरुन शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सोमवारी मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबीयांचा पाहुणचार स्वीकारला. या भेटीवेळी बोलताना, उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे, जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री (Chief Minister) होत नाहीत तोपर्यंत दु:ख जाणार नाही, अशा शब्दात शंकराचार्यांनी खंत व्यक्त केली होती. शं‍कराचार्यांच्या या विधानामुळे आता हिंदूंच्या अन्य महंतांनी पुढे येऊन उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार टीका केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे पहिले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनीच पद भूषवले. त्यामुळे, भाजपाकडून सातत्याने शिवसेनेने हिंदुत्त्व सोडल्याचा आरोप केला जात आहे. तर, शिवसेना शिंदे गटाकडूनही ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार आणि हिंदूत्व सोडल्याचा आरोप केला जातो. त्यातच, ज्योतीर्मठाच्या शंकराचार्यांना घरी बोलावून उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या आरोपाला एकप्रकारे उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र ठाकरे-शं‍कराचार्यांच्या भेटीवरुन महंतांनी प्रश्नांचा भडीमार केला आहे.

पूज्यपाद्य शंकराचार्य यांनी आवर्जून सांगायला पाहिजे की, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेसोबत विश्वासघात केला आहे, त्यावर काय म्हणायचे आहे. ज्यांनी सनातन धर्माच्या विचारधारेबद्दल विश्वासघात केला, ज्यांनी वीर सावरकर यांच्या विचारधारेसोबत विश्वासघात केला, त्यावर काय म्हणायचे, असा सवाल आचार्य प्रमोद कृष्णम यांनी विचारला. तसेच, शं‍कराचार्यांनी यावर प्रकाश टाकायला हवा, मला पूर्ण विश्वास आहे की, पूज्यपाद्य शंकराचार्यजी यावर नक्कीच प्रकाश टाकतील, असेही महंतांनी म्हटले आहे.

आम्ही कोणाला विश्वासघाती म्हणतोय, कोणाला धोकेबाज म्हणतोय हे विचारपूर्वक आणि समजून घेत पूज्यनीय शं‍कराचार्यांनी विधान करायला हवं. उद्धव ठाकरे हे विद्रोही लोकांसोबत गेले होते. त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आशीर्वाद देणे हा समस्त हिंदू समाजाचा छळ असल्याचे महंत नारायण गिरी यांनी म्हटले आहे. परमपूज्य आणि परम वंदनीय शंकराचार्य यांनी असे विधान करणे योग्य नाही, असेही महंतांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर ते असे देखील म्हटले की आम्ही शंकराचार्यांचा आदर करतो. मात्र जय आणि पराजय हे सांगणे आमचे काम नाही, ते जनतेचे काम आहे. आमचे काम पूजा पाठ करण्याचा आहे. त्यामुळे कुणाला धोकेबाज, कुणाला विश्वासघातकी म्हणणं, अशी विधाने विचार करून केली पाहिजेत. असे देखील यावेळी महंत नारायणगिरी यांनी म्हटले.

त्यामुळे आता शंकराचार्यांच्या मातोश्री भेटीवरून शंकराचार्य-महंतांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -