शंकराचार्यांनी आधी उद्धव ठाकरेंचे कान टोचायला हवे होते

Share

शिवसेना मुख्य सह प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांची उबाठावर खरमरीत टीका

मुंबई : ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्री भेटीत पालघर येथील साधु हत्याकांडाबाबत सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांचे कान टोचायला हवे होते, अशी अपेक्षा शिवसेना मुख्य सह प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी व्यक्त केली.

शिवसेना पक्ष कार्यालय बाळासाहेब भवन येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शंकराचार्य म्हणाले “खरा हिंदू विश्वासघात करीत नाही” तेच वाक्य पकडून डॉ. वाघमारे पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हयात असे पर्यंत कोणतेही सत्तेचे पद स्वीकारले नाही. याउलट उबाठाने आपले ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करतो सांगून स्वत: मुख्यमंत्रीपदाची खूर्ची बळकावली हा विश्वासघात नव्हता का? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हिंदूत्व सोडून सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन लाखो शिवसैनिकांना फसवले हा विश्वासघात करणारे उद्धव ठाकरे हे शंकराचार्यांच्या म्हणण्याप्रमाणे हिंदू कसे असू शकतात? असा सवाल वाघमारे यांनी उपस्थित केला.

निवडणुकीत घसरलेला मताचा टक्का सावरण्यासाठी आणि जनतेत गेलेली पत सुधारण्यासाठी उबाठाने शंकराचार्यांचा वापर केला की काय अशी शंका मनात येते. यासाठीच जणू शंकराचार्यांना मातोश्रीवर आमंत्रण देण्यात आले होते का? अशी शंका त्यांनी उपस्थित केली.

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गक्रमण करत आहेत. आदरणीय शंकराचार्य हिंदू धर्माचे सर्वात मोठे गुरु समजले जातात पण हिंदूत्वावर बोलण्याऐवजी महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलणे हे कितपत संयुक्तिक आहे, असा प्रश्न जनतेला पडला असल्याचे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.

हिंदूत्वाबाबत मनात जराही आस्था नसणारे राहुल गांधी आषाढी वारीत सहभागी होणार हे सांगत राज्यातील काँग्रेस नेते नाचत होते. मात्र वारीसाठी, वारकऱ्यांसाठी, महाराष्ट्राच्या आराध्य दैवत विठोबा माऊलीसाठी वेळ नसल्याचे कारण देऊन राहुल गांधी यांनी लाखो वारकऱ्यांचा व तमाम मराठी जनतेचा अपमान केला आहे, अशी टीका डॅा. वाघमारे यांनी केली.

Recent Posts

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…

58 minutes ago

Summer Food Alert : उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणारे ‘हे’ पदार्थ टाळा

मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…

1 hour ago

Health Tips: कडक उन्हामुळे चक्कर येत असेल तर हे पेय प्या!

तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…

1 hour ago

प्रसिद्ध डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी महिलेला पोलीस कोठडी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…

1 hour ago

Central Railway News : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; बदलापुरातील फलाट क्रमांक १ कायमस्वरूपी बंद!

बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…

2 hours ago

संग्राम थोपटे २२ एप्रिल रोजी भाजपात प्रवेश करणार, काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…

2 hours ago