Pooja Khedkar : पूजा खेडकरांच्या आईवडिलांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांकडून छापेमारी!

पाथर्डी आणि मुंबईतील घराची घेतली झडती


वाशिम पोलिसांकडून पूजा खेडकर यांची तब्बल ३ तास चौकशी


पुणे : गेल्या काही दिवसांपासून आयएएस अधिकारी ३२ वर्षीय पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रचंड चर्चेत आल्या आहेत. पुण्यात केवळ प्रोबेशनरी अधिकारी असताना एखाद्या जिल्हाधिकाऱ्यालाही लाजवेल अशा सरंजामी थाटामुळे त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. पूजा खेडकर यांचे उत्पन्न, श्रीमंत थाट ते त्या सनदी अधिकारी होण्यास कशाप्रकारे पात्र नव्हत्या, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. त्यातच आणखी एका प्रकरणामुळे त्यांचे आईवडील देखील चर्चेत आले आहेत. त्यांच्या पालकांशी संपर्क होत नसून पुणे पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी पाथर्डी आणि मुंबईमध्ये मोठी छापेमारी केली आहे. तर पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबद्दल वाशिम पोलिसांनी त्यांची तब्बल ३ तास चौकशी केली.


पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पौड पोलीस ठाण्यात मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल आहेत. या सगळ्यांवर बंदुकीने धाक दाखवत शेतकऱ्यांना धमकवल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची पाथर्डीसह मुंबईतील विविध ठिकाणी मोठी छापेमारी सुरू आहे. पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील फार्म हाऊसवर देखील पोलिसांनी छापेमारी केली.


दरम्यान, पूजा खेडकर यांच्या आईला शस्त्र परत करण्यासाठी देखील काल पुणे पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर आता पूजा खेडकर यांच्या पालकांशी संपर्क होत नसल्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी पुणे पोलीस विविध शहरांत त्यांचा शोध घेत आहेत.



पूजा खेडकर यांची तब्बल ३ तास चौकशी


पूजा खेडकर यांची वाशिम पोलिसांनी तब्बल तीन तास चौकशी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह दोन अधिकाऱ्यांकडून वाशिम येथील शासकीय विश्रामगृहात पूजा खेडकर यांची काल मध्यरात्री चौकशी करण्यात आली. बंद खोलीत ही चौकशी झाली असल्याने चौकशीत खेडकर यांना काय विचारण्यात आलं? याबाबत कळू शकलेलं नाही. दरम्यान, चौकशीनंतर पूजा खेडकर यांनी माध्यमांसोबत बोलण्यास नकार दिला.



काय आहे पूजा खेडकर प्रकरण?


पूजा खेडकर या महाराष्ट्र केडरच्या २०२२ च्या बॅचमधील IAS अधिकारी आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुण्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. प्रोबेशनरी अधिकाऱ्यासाठी स्वतंत्र केबिन किंवा गाडीची सुविधा नसते. मात्र, पूजा खेडकर या स्वत:च्या खासगी ऑडी गाडीवर लाल-निळा दिवा आणि महाराष्ट्र शासन अशी नेमप्लेट लावून फिरायच्या. याशिवाय, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावून पूजा खेडकर यांनी तिकडे स्वत:चे कार्यालय थाटले होते. या कार्यालयातील फर्निचरही पूजा खेडकर यांनी बदलले होते. या सगळ्या सरंजामी थाटामुळे पूजा खेडकर या सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अखेर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहून त्यांच्या बदलीची शिफारस केल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला होता.


त्यानंतर याप्रकरणी नवनवीन धक्कादायक खुलासे झाले. त्यांनी नाव बदलून परीक्षा दिल्याचं देखील समोर आलं आहे. तर त्यांनी युपीएससी प्रशासनाला दिलेल्या दिव्यांगत्व प्रमाणपत्रावर देखील संशय व्यक्त केला जात आहे. त्याचीही चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. पूजा खेडकर यांच्यानंतर त्यांचे आईवडिल देखील वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Comments
Add Comment

Monsoon in Jalgaon : पावसाची ९२ टक्के तूट; पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतेत

जळगाव : जळगाव जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाने मोठी ओढ दिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान

Weather Station : प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक

Beed Murder Case: धक्कादायक! भांडण सोडवायला गेला आणि जीव गमावून बसला

बीडमध्ये हॉटेल चालकाची हत्या Beed Murder Case : बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यात एका २५ वर्षीय हॉटेल चालकाची चाकूने

Devendra Fadnavis : ९७ हजार ७०६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

 फडणवीस सरकारचा नवा विक्रम; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २० हजार ७५२ कोटींची तरतूद मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या

Ambenali Ghat: २०० फूट दरीत कोसळलेल्या तरुणाला मिळाली 'नवसंजीवनी'; स्थानिक ट्रेकर्सचे धाडसी ऑपरेशन!

महाबळेश्वर (सातारा) : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि घनदाट जंगलासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या आंबेनळी

Devendra Fadnavis : महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार मुंबई : "राज्य विधिमंडळाचे सोमवारपासून