Friday, May 9, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

Fitness: वजन कमी करण्यासाठी कधी करावे वर्कआऊट, जाणून घ्या योग्य वेळ

Fitness: वजन कमी करण्यासाठी कधी करावे वर्कआऊट, जाणून घ्या योग्य वेळ

मुंबई: वजन नियंत्रित करण्यासाठी वर्कआऊट करणे गरजेचे आहे. अधिकतर लोक सकाळी अथवा संध्याकाळी जिममध्ये जात अथवा घरी एक्सरसाईज करतात. मात्र फार कमी लोकांना वर्कआऊट करण्याची योग्य वेळ माहीत आहे. सकाळी की संध्याकाळी कोणत्या वेळेस वर्कआऊट केले पाहिजे. ज्यामुळे वजन वेगाने कमी होईल.



वर्कआऊट करण्याची योग्य वेळ


वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी वर्कआऊट केल्याने शरीरातील फॅट अधिक बर्न होते. यामुळे मेटाबॉलिज्मही चांगला राहतो. सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी एक्सरसाईज केल्याने वजन दुपटीने कमी होते.



सकाळी किती वाजता वर्कआऊट करावे


तज्ञांच्या मते सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत केला जाणारा व्यायाम चांगला ठरू शकतो. यामुळे संपूर्ण दिवसभर एनर्जेटिक राहता येते. सकाळी एक्सरसाईज केल्याने हॉर्ट रेट वाढतो. तसेच रक्ताभिसरण प्रक्रिया वेगाने होते. यामुळे शरीराचे तापमानही नियंत्रित राहण्यास मदत होते.



संध्याकाळी व्यायाम करावा की नाही


तज्ञांच्या मते दिवसभर काम केल्यानंतर शरीराचे तापमान वाढलेले असते. अशातच वजन कमी कऱण्यासाठी वर्कआऊट करत असाल तर याचा परिणाम चांगला मिळू शकतो. दरम्यान, संध्याकाळी एक्सरसाईज करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे आपले पोट रिकामी असले पाहिजे. यामुळे फॅट कमी होण्यास मदत होते.

Comments
Add Comment