मुंबई: एलआयसी प्रत्येक वर्गातील तसेच विविध वयोगटातील लोकांसाठी विविध योजना राबवत असते. एलआयसीच्या योजना तुम्हाला सुरक्षा आणि रिटर्नची गॅरंटी देतात.
अशातच एलआयसीची अशी एक योजना आहे ज्यात तुम्हाला सुरक्षा मिळतेच तसेच लाखोंचे रिटर्न्सही मिळतात. या पॉलिसीचे नाव आहे जीवन उमंग.
या योजनेत तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक करून मोठी रक्कम जमा करू शकता. या स्कीममध्ये पॉलिसी पूर्ण होईपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्ही अनेक मॅच्युरिटी फायदे मिळवू शकता.
पॉलिसीची मॅच्युरिटी झाल्यानंतर तुम्हाला २५ लाख रूपये मिळू शकतात. यासाठी ३५ वर्षांच्या कालावधीसाठी तुम्हाला दरमहा १६३८ रूपये जमा करावे लागतील. अशातच दररोज तुम्हाला ४५ रूपयांची बचत करणे गरजेचे आहे.