Accident news : विठ्ठलदर्शनाला निघालेल्या भक्तांच्या बसला अपघात! ५ जणांचा मृत्यू

८ जण गंभीर तर २० ते ३० जण किरकोळ जखमी


नवी मुंबई : आषाढी एकादशीला अवघा एक दिवस उरल्यामुळे राज्यात सर्वत्र भक्तीमय वातावरण झाले आहे. विठूनामाचा गजर करत वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. मात्र, यात एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. विठूमाऊलीच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या बसचा अपघात झाला आहे. यात ५ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी आहे, तर २० ते ३० जण किरकोळ जखमी झाले आहेत. डोंबिवलीवरून (Dombivli) पंढरपूरला (Pandharpur) जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway Highway) भीषण अपघात (Terrible Accident) झाला.


गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून सातत्याने अपघाताच्या चित्रविचित्रघटना समोर येत आहेत. त्यातच आता वारकऱ्यांच्या बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या बसमधून एकूण ५४ वारकरी प्रवास करत होते. डोंबिवलीवरुन हे सर्वजण विठ्ठलाच्या ओढीने पंढरीच्या दिशेने निघाले होते. पण वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन बस पंढरपूरच्या दिशेने जात असताना भीषण अपघात झाला.


वारकऱ्यांच्या बससमोर एक ट्रॅक्टर जात होता. बसवरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर बस जाऊन आदळली. पुढे बस अनियंत्रित होऊन थेट ३० ते ४० फूट खड्ड्यात जाऊन पडली. यावेळी ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.


दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. सर्व जखमींना एमजीएम रूग्णालय आणि पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला बंदी असतानाही ट्रॅक्टर एक्सप्रेसवेवर आलाच कसा? पोलीस यंत्रणा कार्यरत नाही का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment

Rain Update: पावसामुळे मोनो रेल बंद पडली, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी हे वाचून घ्या

मुंबई: मुंबई तसेच उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई: मुंबई शहरात आणि उपनगरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता निर्माण

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली