Chandipura Virus : गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसची एन्ट्री! सहा जणांना विषाणूची लागण, चौघांचा मृत्यू

गांधीनगर : पुण्यामध्ये (Pune) सध्या झिका व्हायरसने (Zika Virus) धुमाकूळ घातला असताना गुजरातमध्येही एका नव्या व्हायरसने डोके वर काढले आहे. कोरोना (Corona) व्हायरसनंतर गुजरातमध्ये 'चांदीपुरा' (Chandipura Virus) नावाच्या व्हायरसने एन्ट्री केली आहे. यामुळे दोन दिवसांत चौघांचा मृत्यू झाला आणि इतर दोघांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान या व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आरोग्य विभागही (Health Department) सतर्क झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात चांदीपुरा विषाणूच्या संसर्गामुळे चार मुलांचा मृत्यू झाला. एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार चार मुलांना चांदीपुरा व्हायरसची लागण झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यासोबत आणखी दोन मुलांना या व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या या मुलांवर उपचार सुरु असून त्यांचे रक्ताचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मुलांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागही सक्रिय झाला असून साबरकांठा आणि अरावली जिल्ह्यात नवीन व्हायरसबाबत सर्वेक्षण सुरू केलं आहे.


दरम्यान, हा व्हायरस रोखण्यासाठी आज आरोग्य विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक होऊ शकते, असा दावा केला जात आहे. या बैठकीत चाचणीसह इतर योजनांबाबत निर्णय घेतला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.



लक्षणे


'चांदीपुरा' व्हायरसची लागण झालेल्यांना ताप येतो, ज्याची लक्षणे फ्लूसारखी असतात. यामुळे गंभीर एन्सेफलायटीस (मेंदूची जळजळ) होते. त्यासोबत मेंदूला सूज येणे अशी अनेक लक्षणे दिसू लागतात. हा विषाणू Rhabdoviridae कुटुंबातील वेसिक्युलोव्हायरस वंशाचा सदस्य आहे. जे डास, वाळू माशी आणि कीटकांद्वारे पसरते.



उपाय


या विषाणूपासून संरक्षण करण्याचे उपाय मलेरियापासून बचाव करण्यासारखे आहेत. जसे घरामध्ये आणि आजूबाजूला स्वच्छता राखणे, डास किंवा माश्या यांच्या संपर्कात येऊ नये आणि झोपताना मच्छरदानीचा वापर करणे.

Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन