मुंबई : मुंबईकरांचा शनिवार उजाडला तोच मुसळधार सरींनी; भल्या पहाटे काळोख केलेल्या पावसाने दुपारी ३ वाजेपर्यंत पूर्व आणि पश्चिम उपनगरात अक्षरश: धुवाँधार बरसात केली. विशेषत: ब्रेक घेत का होईना दाखल होणा-या पावसाच्या मोठया सरींमुळे मुंबईकरांची तारांबळ उडत होती. शहरात मात्र पाऊस कमी असला तरी सोसाटयाचा वारा आणि पाऊस अशा दोन्ही वातावरणाने मुंबई बेजार झाली होती.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने शनिवारी सकाळीच मुंबईकरांना ऑरेंज अलर्ट दिला आणि कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. शुक्रवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत पडणा-या पावसामुळे शनिवारी सकाळीच मुंबई ठप्प होईल, अशी भीती असतानाच मधल्या काळात पावसाने विश्रांती घेतली. मात्र शनिवारी सकाळपासून थांबून थांबून पाऊस कोसळत होता. पंधरा एक मिनिट पडणा-या पावसाच्या मोठया सरींमुळे मुंबईकरांची धावपळ होत होती. कार्यालयीन कर्मचा-यांना शनिवारमुळे अर्धा दिवस असला तरी लोकलला इतर प्रवाशांची गर्दी कायम होती. लोकल नेहमीप्रमाणे दहा ते पंधरा मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यात पाऊस लोकल प्रवाशांनाही झोडपून काढत होता. सकाळपासून दुपारपर्यंत पूर्व आणि पश्चिम उपनगरात सर्वसाधारणपणे हीच अवस्था होती.
गेल्या काही दिवसांपासून सर्वसाधारणरित्या पाऊस आणि ऊनं असे काहीसे वातावरण मुंबईत आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून दाटून येणा-या ढगांची मुंबईकरांनी धास्ती घेतली आहे. कारण हे ढग कायम पाऊस पाडत नसले तरी अधून-मधून मोठा पाऊस घेऊन येत आहेत. सकाळ आणि दुपारच्या सत्रात विद्यार्थी आणि पालकांचे पावसामुळे मोठे हाल झाले. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर पाणी साचले नसले तरी वाहतूकीचा वेग धीमा होता. कुर्ला अंधेरी रोडवर वाहणा-या पावसाच्या पाण्याने दुचाकी आणि रिक्षा चालकांना अडथळे निर्माण होत होते. मुंबई व ठाण्याला जोडणा-या लाल बहादूर शास्त्री मार्गावर पावसाचे पाणी साचले नसले तरी वाहतूक धीम्या मार्गाने धावत होती. पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला. वाहतूकीचा मार्ग अंधेरी सबवे पूर्व गोखले रोडकडे व अंधेरी सबवे पश्चिम एस.व्हि रोड मार्गे गोखले रोडकडे वळविण्यात आला. काळा किल्ला आगार अभियांत्रिक विभाग येथे इमारतीचा सज्जा कोसळून मनुष्यहानी टळली. याकडे लक्ष गरजेचे आहे. सज्जाचे पाडकाम करून तातडीने काढून टाकण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे, अशी माहिती बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिली.
कोस्टल रोड डाऊन दिशेत ब्रीच कँडी रुग्णालय ते मरीन ड्राइव्ह पर्यंत डागडुगीकरीता सर्व वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. या कारणास्तव नवीन बसमार्ग ७८ च्या बसगाड्या मरीन ड्राइव्ह – डाऊन येथून पहिल्या बसपासून बसमार्ग १२३ प्रमाणे एन. एस. रोड ने विल्सन कॉलेज, उजवे वळण घेत बाबूलनाथ मंदिर, डावे वळण घेत केम्स कॉर्नर (उड्डाणपूल खाली) पुन्हा डावे वळण घेत बसमार्ग ७७ प्रमाणे मुकेश चौक ते ब्रीच कँडी रुग्णालय व तेथून पुढे नेहमीच्या मार्गाने धावत होत्या.
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…