मुंबई : गेले काही दिवस मुंबईसह उपनगरांत पावसाने (Heavy rainfall) जोर धरला आहे. थोडा काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा मुसळधार पाऊस सुरुच आहे. याचा मध्य रेल्वेला (Central railway) मोठा फटका बसत आङे. स्थानकांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची सेवा धिम्या गतीने चालू आहे. त्यामुळे प्रवासी आधीच वैतागलेले असताना आता आणखी एका गोष्टीमुळे प्रवाशांना उशीर होणार आहे. माटुंगा रेल्वे स्थानक (Matunga Railway station) येथे रुळाला तडे गेले आहेत. यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
माटुंगा येथे डाउन धिम्या मार्गावरील रुळाला तडा गेला आहे. त्यामुळे धिम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या. दरम्यान रेल्वे रुळाची तात्पुरती डागडुजी करून धिम्या मार्गावरून लोकल सुरू करण्यात आली आहे. रेल्वे रुळाला तडे गेल्याची बाब समोर आल्यानंतर लोकल सेवा विस्कळीत झाली होती. धिम्या मार्गावरील लोकल सेवा ७ ते १० मिनिटे उशिराने धावत आहे.
कल्याण धिम्या लोकल लोको पायलटला रुळाला तडा गेल्याचं दिसलं. त्यानंतर त्यांनी याची माहिती कंट्रोलला दिली. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात रेल्वे रुळाला गेलेल्या तड्याची डागडुजी करण्यात आली. दुपारी एकच्या दरम्यान रुळाला तडा गेल्याचं समोर आलं होतं. १.४० पर्यंत स्लो ट्रॅक वरून पुन्हा लोकल सुरू झाल्या. दरम्यानच्या काळात डाउन स्लो मार्गावरील गाड्या या जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. तरीही या वाहतुकीवर परिणाम झाला असून सध्या मध्य रेल्वेची लोकल सेवा ७ ते १० मिनिट उशिराने सुरू आहे.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…