Mumbai Railway : मध्य रेल्वे स्थानकात आता साचणार नाही पाणी; मात्र...

प्रशासनाने घेतला 'हा' मोठा निर्णय!


मुंबई : तीन दिवसांपूर्वी राज्यभरात जोरदार अतिवृष्टी (Maharashtra Rain) झाल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले होते. त्यानंतर काहीकाळ विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पहाटेपासून दमदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. याचा फटका नेहमीप्रमाणे रेल्वे लोकलवर (Local Train) पडला असल्याचे दिसून येत आहे. आजही सकाळपासून झालेल्या पावसामुळे रेल्वे स्थानकांजवळ पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. रेल्वे प्रवाशांची होणारी कोंडी पाहता मध्य रेल्वेने स्थानकांवर पाणी न साचण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी झालेल्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली. मध्यरात्री ते पहाटेपर्यंतच्या ६ तासांमध्ये ३०० मिमीची नोंद झाली. यामुळे मिठी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने चुनाभट्टी स्थानकातील रूळ पाण्याखाली गेले होते. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी चुनाभट्टी स्थानकातील फलाटालगत असलेल्या सीएसएमटीकडे आणि पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वे रुळांची उंची २ ते ४ इंचांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यासोबत ओव्हरहेड वायरच्या रचनेतही बदल करण्यात येणार आहे.



'या' स्थानकांची उंची वाढवणार


सीएसएमटीकडे जाणाऱ्या ४४० मीटर लांबीच्या आणि पनवेलकडे जाणाऱ्या ३५० मीटर लांबीच्या रुळांची उंची वाढवण्यात येणार आहे. सध्या १०० मीटर लांबीच्या रुळांची उंची वाढवण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात असलेल्या अत्याधुनिक मशिनच्या मदतीने उंची वाढवण्यात येत असून येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव चुनाभट्टी स्थानक परिसरात वेगमर्यादेसह लोकल धावत्या राहणार आहेत, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.



फलाटांची उंचीही वाढणार


रुळांची उंची वाढवल्यानंतर लोकल डब्याचे पायदान आणि फलाट यांच्यातील अंतर वाढते. यामुळे मोठ्या प्रमाणात उंची वाढवताना मर्यादा येतात. पायदान आणि फलाटातील अंतर कमी करण्यासाठी फलाटांची उंचीही वाढवण्याचे नियोजन आहे. यासाठी साधारण दीड ते दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

मुंबईच्या मतदारयादीत ११ लाख दुबार मतदार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बेस्ट भरती करणार ५०० वाहक

मुंबई : दिवसेंदिवस कमी होत चाललेली कर्मचाऱ्यांची संख्या व सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर येणारा अतिरिक्त ताण

आयआयटी मुंबईत पहिल्या वर्षासाठी मानसिक आरोग्य अभ्यासक्रम अनिवार्य

मानसिक आरोग्यावर आधारीत अभ्यासक्रम लावणारा मुंबई आयआयटी पहिलाच मुंबई : आयआयटी मुंबईने आपल्या पहिल्या वर्षातील

वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे १९-२० डिसेंबरला मुंबईत आयोजन

जगभरातील अग्रणी उद्योगपती, व्यावसायिक आणि विचारवंत यांना एकत्र आणणारे व्यासपीठ मुंबई : वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक

अंधेरी एमआयडीसीमध्ये रासायनिक गळती

एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर मुंबई : अंधेरी (पूर्व) येथील एमआयडीसी परिसरातील भंगारवाडी येथे शनिवारी

शीळफाटा येथे उड्डाणपुलाच्या कामानिमित्त निळजे-दातिवलीदरम्यान ब्लॉक

मुंबई : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन प्रकल्पासाठी शीळ फाटा येथील उड्डाणपूल हटविण्याच्या कामासाठी,